Type Here to Get Search Results !

वरंधा घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली, महाडला जाणाऱ्या मार्गावर अपघात

 


वरंधा घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली, महाडला जाणाऱ्या मार्गावर अपघात


भोर (पुणे) : भोर मार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या वरंधा घाटात उंबर्डे गावाच्या हद्दीत ९० फूट खोल दरीत कार गेल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सुदैवाने कारमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, भोर मार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातील उंबर्डे (ता. भोर) गावच्या हद्दीत गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले असता चालकाने चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून गाडीतील चालकासह तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले. परंतु अचानक गाडी उताराने पुढे जाऊन दरीत कोसळली.

सुदैवाने गाडीत कुणी नसल्याने अनर्थ टळला. मात्र यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रथमदर्शी अक्षय धुमाळ यांनी सांगितले. याबाबत भोर पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत अपघाताबाबत कोणतेही नोंद करण्यात आली नसल्याचे भोर पोलिस स्टेशनकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments