नात्याला काळीमा फासणारी घटना ! बदनामी करण्याची धमकी ! चुलतीवर केला लैंगिक अत्याचार
पुणे : नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील पर्वती भागात घडली असून, बदनामी करण्याची धमकी देऊन पुतण्याने चुलतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एप्रील २०१६ ते डिसेंबर २०१९ कालावधीत कसबा पेठेत घडला आहे. याबाबत ३७ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रारदार दिली आहे. त्यानुसार पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेचा आरोपी हा फिर्यादी यांचा पुतण्या आहे. त्याने त्यांच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्या ओरडल्या असता आरोपीने मी तुझ्या मुलींना व नवऱ्याला तसेच सगळ्यांना सांगेन की तूच मला वरती बोलावून घेतले.तसेच, त्यांना बदनामी करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक सबंध निर्माण प्रस्थापित केले. तसेच त्यांच्याकडून वारंवार पैसे उकळले. आरोपीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने गुरुवारी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अघिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत
Post a Comment
0 Comments