Type Here to Get Search Results !

कोंढाव्यातील डायग्नोस्टीक सेंटरमध्ये तोडफोड ? कोंढवा पोलिसांनी हत्यारासह आरोपींना केले तातडीने अटक...

कोंढाव्यातील डायग्नोस्टीक सेंटरमध्ये तोडफोड ? कोंढवा पोलिसांनी हत्यारासह आरोपींना केले तातडीने अटक...

पुणे : कोंढवा पोलिसांनी अवघ्या 2 तासात हत्यारासह आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी 23 ऑक्टोबर रोजी पुना डायग्नोस्टीक सेंटर, सोमजी, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे तीन अज्ञातांनी येऊन लॅब मध्ये तोडफोड केली तसेच तपासणी साठी आलेले सुरेश मोतीलाल शहा यांना कोयत्याने मारहाण केली म्हणून कोंढवा पोलिस येथे 1091/2023 भा द वी गुन्हा 326,506,427,34 , महा पोलिस आधी कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला.

वरिष्ठांचे आदेशाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असता पोलीस हवा अमोल हिरवे, पोलीस अंमलदार शशांक खाडे यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी खडी मशीन चौक येथे येणार आहेत. घटनास्थळी जाऊन आरोपी

1) आशिष सुरेश दुधनिकर (वय 24 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे)
2) धीरज लहू धेले (वय 19 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे)
3) अक्षय प्रताप निकम (वय 24 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे) यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 2 तासात हत्यारासह ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिस स्टेशन येथे आणले असता त्यांनी लॅब व्यवसायाचे कारणावरून सदर गुन्हा केल्याचे कबूल केले.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदीप कर्णिक पोलिस सह आयुक्त, रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग विक्रांत देशमुख पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 5, शाहूराजे साळवे सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, संदीप भोसले, पोलिस निरीक्षक गुन्हे, संजय मोगले पोलिस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पो हवा अमोल हिरवे, पोलीस अंमलदार राहुल वंजारी, रत्नपारखी, रासगे, मरगळे, भोसले, पाटील, गरुड, मोरे, थोरात, शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments