Type Here to Get Search Results !

कोल्हापुर येथील आपटेनगर येथे भरधाव कारने दोन वाहनांना दिली धडक, पाच जण जखमी...


कोल्हापुर येथील आपटेनगर येथे भरधाव कारने दोन वाहनांना दिली धडक, पाच जण जखमी...
कोल्हापूर (प्रतिनिधी) ;- भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने दोन वाहनांना जोरात ठोकर मारल्याने झालेल्या अपघातात एका दांपत्य सह पाच जण जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी साधारण सात च्या दरम्यान हा अपघात कळंबा ते फुलेवाडी रिंगरोडवर आपटेनगर येथे झाला.या बाबत मोटारीचा चालक सर्जेराव धनाजी करपे (रा आर के नगर) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राजाराम पोवार ( रा शेंडुर ता कागल) यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. राहुल पोवार, राजवर्धन बावडेकर,तृप्ती बावडेकर,(रा कणेरकर नगर) दत्तात्रय मोरे(रा आपटेनगर अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments