Type Here to Get Search Results !

"असे किती पत्रकार घरी बसवले" पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमधील तथास्तु क्रिटिकल केरच्या कर्मचाऱ्यांचे बोल ? वरिष्ठांच्या नावाने एकेरी उल्लेख ; कोण आहेत यांच्या पाठीशी ? हिंदी मराठी पत्रकार संघ करणार आंदोलन...

"असे किती पत्रकार घरी बसवले" पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमधील तथास्तु क्रिटिकल केरच्या कर्मचाऱ्यांचे बोल ? वरिष्ठांच्या नावाने एकेरी उल्लेख ; कोण आहेत यांच्या पाठीशी ? हिंदी मराठी पत्रकार संघ करणार आंदोलन...

पुणे :- पुण्यातील कॅम्प भागात असलेले सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल यामध्ये एक नवीनच प्रकार घडला आहे. त्या हॉस्पिटल मधील तथास्तु क्रिटिकल केअर इंटेन्सिव्ह केअर युनिट हे बाह्य कंपनीला दिले आहे. त्यामधील कर्मचारी हे अतिशय उग्रीट असल्याचे अनेक नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यातच आणखीन एक भर पडता पुण्यातील नावाजलेल्या पत्रकारांशीच कर्मचाऱ्यांनी थोडे पैसे कमी करण्यावरून पत्रकारांची प्रतिमा मलीन होईल या स्वरूपात भाष्य केले आहे. या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले बिलिंग युनिटचे एका महिला कर्मचाऱ्याने एका वरीष्ठ पत्रकाराला सांगितले की, असे कितीतरी पत्रकार आमच्याकडे येतात आणि अशी कितीतरी पत्रकार आम्ही घरी बसवलेले आहेत.
तसेच त्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टर भुजबळ यांच्या नावाने एकेरी भाषा वापरली असल्याचे तेथील असलेल्या नागरिकांनी व पत्रकारांनी सांगितले आहे. यातच आता एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे की, तथास्तु क्रिटिकल केअर हे चालवणाऱ्यांना साथ कोणाची आहे? यांच्या पाठीशी नेमके कोण आहेत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आर एम ओ उषा तपासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलले नसल्याचे कळाले आहे. यावर तथास्तु क्रिटिकल केअर यांच्या संचालकांवर तसेच तेथील असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रामुख्याने बिलिंग पाहणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर  मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल हे कोणती कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्ण हक्क आणि धाव घेत आहे परंतु त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे त्यांचा खूप मोड होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत.

कारवाई झाली नाही तर आंदोलन करणार...
आमच्या पत्रकारांशी अशाप्रकारे जर वागणूक देत असतील तर आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो संबंधित आणि संचालकांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आंदोलन करू असा इशारा हिंदी मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments