Type Here to Get Search Results !

पुण्यातील कल्याणीनगर मधील असलेले ELROW पब पाहटे 5 वाजेपर्यंत सुरूच ; नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा पब पहाटे पर्यंत ?

पुण्यातील कल्याणीनगर मधील असलेले ELROW पब सुरू आहे पाहटे 5 वाजेपर्यंत ; नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा पब पहाटे पर्यंत : पहा व्हिडीओ...

पुणे :- पुणे शहरात पोलीस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शहर 11 वाजता बंद करण्याचे आदेश दिले असताना देखील, पुण्यातील कल्याणी नगर येथे असलेले ELROW पब हे थेट पहाटे 5 पर्यंत सुरू असल्याची मोठी बाब समोर आली आहे. यामुळे अनेक प्रश्न यामध्ये उद्भवत आहेत. पुण्यातील रेस्टॉरंट आणि बारला रात्री दीड वाजेपर्यंत ची मुभा असल्याचे माहिती असताना यांना वेगळे नियम कोणामुळे आहेत सध्या तोच प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस स्टेशन मधील रात्री ड्युटी करत असणारे अधिकाऱ्यांचे लक्ष याकडे का जात नाही हा देखील मोठ्ठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये कोण कोणती शासकीय खाते व त्यामधील अधिकारी सामील आहेत. यावर देखील आम्ही माहिती घेत आहोत. त्यातल्या त्यात त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी स्टिंग ऑपरेशन मध्ये आणखीन मोठ्या बाबी उघडकीस आणल्या आहेत. त्यामध्ये मोठी बाब अशी की, या पबमध्ये लहान मुले 15, 16 आणि 17 वयाची मुले देखील येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरातील युवक युवतींचा आणि त्यांच्या माता-पितांचा मोठा नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच एखादा मोठा गुन्हा यामुळे घडू शकतो याला देखील नाकारता येणार नाही.  तसेच इतर पब रात्री दीड वाजता बंद होत असताना मात्र ELROW पब हे यांच्याकडे रात्री एक वाजता तर यांच्याकडे ग्राहकांची सुरुवात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तंबाखू हुक्का देखील सुरू असल्याचे दिसून आले आहे. या वरील सर्व बाबींचा व्हिडीओ देखील आम्हाला प्राप्त झाला आहेत.

इमर्जन्सी एक्झिट नाही ?
ELROW पब हे सदर इमारतीमध्ये 8 व्या मजल्यावर आहे आणि रुफटॉप वर असल्याने त्याला एक्झिट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याला चारी बाजू बंद करून घेतले आहे. जर त्या ठिकाणी आग वगैरे किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल तर त्यावेळेस इमर्जन्सी एक्झिट हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवू शकतो.

आय टी पार्क असलेल्या इमारतीत सुरू पब...
सदर इमारत मारीगोल्ड कॉम्प्लेक्स मधील सेरेब्रम आय टी पार्क यामध्ये सूरु आहे. या इमारतीत वेगवेगळ्या आयटी कंपन्यांचे कार्यालये आहेत. अनेक कंपन्या या इमारतीमध्ये आहे. यामध्ये असलेले कर्मचारी यांना याचा मोठा त्रास भोगावा लागत असल्याचे देखील समोर आले आहे. 

Post a Comment

0 Comments