Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

हिंदी मराठी पत्रकार संघाची पुणे शहर कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्ष पदी मुज्जम्मील शेख, उपाध्यक्ष पदी सुरेश गुप्ता आणि सचिव पदी राहुल हरपळे यांची निवड...

हिंदी मराठी पत्रकार संघाची पुणे शहर कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्ष पदी मुज्जम्मील शेख, उपाध्यक्ष पदी सुरेश गुप्ता आणि सचिव पदी राहुल हरपळे यांची निवड...

पुणे (प्रतिनिधी) :- हिंदी मराठी पत्रकार संघाची पुणे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये पुण्यातील धडाडीचे पत्रकार म्हणून ओळखले जाणारे युवा पत्रकार मुज्जम्मील शेख यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या पुणे शहर अध्यक्ष पदी तसेच उपाध्यक्ष पदी सुरेश गुप्ता आणि सचिव पदी राहुल हरपळे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र हिंदी मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी दिले आहे. मुज्जम्मील शेख ह्यांनी अनेक वृत्त संस्थेत त्यांनी काम केले आहेत. तसेच सध्या ते सध्या टाईम्स ऑफ महाराष्ट्र या वेबपोर्टलचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत. तसेच दैनिक हॅलो प्रभात या वृत्तपत्रात ते पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या समवेत उपाध्यक्ष पदी दक्ष पोलीस टाईम्स वृत्तपत्राचे पुणे विभागीय संपादक सुरेश गुप्ता आणि सचिव पदी न्युज प्रहारचे उप संपादक राहुल हरपळे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्यानंतर सर्व स्तरावरून त्यांचे गौरव करण्यात येत आहे.

निवड झाल्यानंतर शेख यांनी सांगितले की, लवकरच हिंदी मराठी पत्रकार संघाची पुणे शहरात कार्यकारणी तयार करणार आहेत. यामध्ये नवीन देखील पत्रकारांना संधी देणार आहे व वरिष्ठ पत्रकारांना यामध्ये जबाबदारीचे स्थान ते उपलब्ध करून देणार आहेत. तसेच पत्रकारांच्या हितासाठी पुण्यात ते काम करणार आहेत. पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी ते काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments