Type Here to Get Search Results !

खडक पोलीस ठाण्याची उत्तम कामगिरी ; चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करून 5 लाख 25 हजार रुपये केले हस्तगत...

खडक पोलीस ठाण्याची उत्तम कामगिरी ; चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करून 5 लाख 25 हजार रुपये केले हस्तगत...

पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील काशेवाडी भागात एका केक मटेरियलच्या दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम ५,२५,०००/- रुपये चोरी झाल्याची घटना घडली होती.


पुणे :- फिर्यादी यांचा केक मटेरियल विक्रीचा व्यवसाय असुन गेली २५ वर्षापासुन अशोकनगर कॉलनी, काशेवाडी भवानी पेठ, पुणे येथे रिगल एजन्सी नावाने केक मटेरिअल विक्रीचे होलसेल दुकान आहे. दिनांक १५/१०/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता ते स्वतः दुकान बंद करुन घरी गेले होते. त्यावेळी आठवडयातील व्यवसायातून जमा झालेली रोख रक्कम रु. ५,२५,०००/- मोजुन दुकानातील ड्रावर मध्ये ठेवली होती. तसेच शनिवार व रविवार दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने बँकेत रक्कम भरणा केली नव्हती. त्यानंतर दिनांक १६/१०/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ०८.०० वा. दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले ड्रावर मध्ये ठेवलेली रोख रक्कम रु. ५,२५,०००/- मिळुन आली नाही. याबाबत त्यांनी तात्काळ खडक पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने त्यांचे तक्रारीवरुन अज्ञात चोरट्या विरोधात खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३६२/ २०२३ भा.दं.सं. कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

घरफोडी सारखा गंभीर गुन्हा घडल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी सुनिल माने वरिष्ठ पोलीस निरिक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार, सहायक पोलीस निरिक्षक नितीनकुमार नाईक व पो.ना.७६६१ / तांबोळी, पो.शि.८५०० पांडे, पो. शि. ९८०४ शेख यांचे तपास पथक नेमण्यात आले. नेमण्यात आलेल्या पथकामार्फत अज्ञात चोरटयाचा शोध चालु असताना तपास पथकातील अंमलदार पो.शि.८९४८ चव्हाण, पो. शि.९१०२ वाबळे यांना त्यांचे खबऱ्या मार्फत माहीती मिळाली की, काशेवाडी येथे राहणारा झुरळ्या ऊर्फ आकाश पाटोळे याने रात्री अशोकनगर कॉलनीत चोरी केली असुन, तो पळुन जाण्याच्या तयारीत आहे. अशी माहीती मिळाल्यानंतर तात्काळ वरील दोन पथकांमार्फत त्या ठिकाणी जावुन सापळा रचुन पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे, वय २७ वर्षे, धंदा मजुरी, रा. अंजुमन मस्जीद शेजारी, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे यास दत्तमंदीराजवळील सार्वजनिक शौचालयाजवळुन ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडुन गुन्हयात चोरी करुन नेवुन लपवुन ठेवलेली रोख रक्कम रु. ५,२५,०००/- हस्तगत करण्यात आली. आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असुन नमुद घरफोडी ची तक्रार प्राप्त झाल्यांनतर अवघ्या दोन तासांतच चोरी केलेल्या संपुर्ण मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळण्यात खडक पोलीसांना यश आले आहे. नमुद सर्व कारवाई ही रितेश कुमार पोलीस आयुक्त, प्रविण पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, संदिपसिंह गिल पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, अशोक धुमाळ सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे सुनिल माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संपतराव राऊत पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी राकेश जाधव सहायक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, श्रेणी पो.उप. निरिक्षक अजीज बेग, पोलीस अंमलदार संदिप तळेकर, आशिष चव्हाण, सागर घाडगे, मंगेश गायकवाड, सागर कुडले, अक्षयकुमार वाबळे, रफिक नदाफ, लखन ढावरे, समीर तांबोळी, तेजस पांडे, अशरफ शेख यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments