Type Here to Get Search Results !

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये या सणासुदीच्या हंगामात महाराष्ट्र शॉपिंग चार्टमध्ये अव्वल ; आकर्षक ऑफरसह 5000 हून अधिक नवीन प्रॉडक्ट केले जाहीर...

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये या सणासुदीच्या हंगामात महाराष्ट्र शॉपिंग चार्टमध्ये अव्वल...

पुणे (प्रतिनिधी): Amazon.in ने आज सणासुदीच्या हंगामात संपूर्ण भारतातील शीर्ष ब्रँड्सच्या सहकार्याने आंतरिक आणि बाह्य रंगांची सर्वसमावेशक अशी श्रेणी लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. घरातील सुधारणांच्या गरजांसाठी वॉटरप्रूफिंग उत्पादने, प्राइमर्स, इनॅमल्स, पेंटिंग टूल्स, मास्किंग टेप्स आणि ड्रॉप शीट कव्हर्सचा समावेश असलेल्या 1,000 हून अधिक शेड्ससह ही सर्वसमावेशक श्रेणी असणार असून, ग्राहकांना रंगांच्या शेड्सची कल्पना आणि तुलना करण्यात मदत करण्यासाठी, ‍अॅमेझॉनने पेंट फाइंडर टूल आणि कॅल्क्युलेटर देखील सादर केले आहेत, जेणेकरुन ग्राहकांना आवश्यक असलेल्या पेंटच्या प्रमाणाचा अंदाज लावता येईल, त्यामुळे अपव्यय टाळता येईल. 

‍‍अमेझॉन इंडियाचे संचालक के. एन. श्रीकांत यांनी ग्राहकांना विलक्षण अनुभव देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. ते म्हणाले, "महाराष्ट्र क्षेत्र हे ‍अॅमेझॉन इंडिया साठी अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि या सणासुदीच्या काळात आमच्या होम, किचन आणि आऊट डोर कॅटेगरी साठी पुणे शहर येथे 70% वार्षिक ऑर्डर वाढले आहेत. भारतातील सर्वात पसंतीचे, विश्वासार्ह आणि आवडते मार्केटप्लेस म्हणून, आम्ही आमच्या महिनाभर चालणाऱ्या अॅमेझॉन ग्रेट इंडिअन फेस्टीव्हल 2023 च्या पहिल्या काही दिवसांत आमच्या ग्राहकांच्या उल्लेखनीय प्रतिसादाने उत्साहित आहोत. या शुभ काळात बहुतेक भारतीय त्यांच्या घरांची सजावट, सुधारणा,  करतात. याकरिता आता संपूर्ण भारतातील ग्राहकांना आंतरिक आणि बाह्य रंगांची 1,000 हून अधिक शेड्स असणाऱ्या श्रेणीची घरबसल्या निवड करता येणार आहे."

Amazon.in वरील होम, किचन आणि आउटडोअर श्रेणीतील संपूर्ण महाराष्ट्रातील आणि पुण्यातील हे काही ट्रेंड्स:

महाराष्ट्राला Amazon.in वर खरेदी करायला आवडते: होम, किचन आणि आउटडोअर श्रेणीतील व्यवसायातील दुहेरी अंकी वाटा म्हणून महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. अॅमेझॉनच्या महाराष्ट्रातील सुमारे 50 टक्के ग्राहक वर्ग टियर-2 आणि उच्च शहरे/नगरांमधून येतात.
अॅमेझॉनच्या होम, किचन आणि आउटडोअर मार्केटसाठी सर्वाधिक नवीन ग्राहकांच्या संख्येत महाराष्ट्राचा वाटा आहे, पुणे हे होम, किचन आणि आउटडोअर्ससाठी वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटी ऑन द राईज: महाराष्ट्रातील २० हून अधिक शहरांमध्ये जवळपास ४५० पिन कोडवरील ग्राहकांसाठी विद्युत स्कूटर आणि बाईक उपलब्ध आहेत. ईव्ही दुचाकींसाठी गेल्या तीन महिन्यांत दिलेल्या सर्व ऑर्डरमधून 25 टक्के ऑर्डर पुण्यातील ग्राहकांचे आहेत.

दि अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2023 हा संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी स्मार्टफोन, फॅशन आणि ब्युटी, मोठी उपकरणे आणि टीव्ही, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि किराणा सामान व आकर्षक ऑफरसह 5,000 हून अधिक नवीन ग्राहकांसह 8 ऑक्टोबर रोजी Amazon.in वर लाईव्ह झाला. यात ग्राहकांना रइक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आणि एटक व्यवहारांवर 10 टक्के पर्यंत झटपट सवलत, डेबिट आणि क्रेडिट कार्डांवर विनाखर्च एटक, इतर आघाडीच्या क्रेडिट/डेबिट कार्डांवरील आकर्षक ऑफर आणि बरेच काही मिळत आहे. 

भारतातील अॅमेझॉनच्या वाढीला चालना देणारी महाराष्ट्र ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. या वाढीला पाठिंबा देण्यासाठी, अॅमेझॉन महाराष्ट्रातील व्यवसायांमध्ये ई-कॉमर्सच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. अॅमेझॉन राज्य आणि देशभरातील स्थानिक स्टोअर्स आणि एमएसएमई सोबत काम करत राहील आणि नवीन साधने, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रम आणेल ज्यामुळे भारतीय व्यवसायांची उद्योजकता वाढेल. ‍अॅमेझॉन इंडियाने ग्राहकांना जलद आणि सुरक्षित डिलिव्हरी मिळू देणारी पूर्तता पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे. ग्राहकांना अखंडीत खरेदी अनुभवासाठी सोयीस्कर एक्सचेंज पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. Amazon.in वरील 12 लाख विक्रेत्यांपैकी जवळपास 1.6 लाख विक्रेते महाराष्ट्रातील आहेत.

अॅमेझॉनचे महाराष्ट्रात 14 एफसी (फुलफिलमेंट सेंटर्स) आहेत, ज्यात 6 दशलक्ष घनफूट पेक्षा जास्त स्टोरेज स्पेस आहे, तसेच 6 रउ (वर्गीकरण केंद्रे) 516,000 चौ. फूट पेक्षा जास्त प्रक्रिया क्षेत्र व्यापलेले आहेत. अॅमेझॉन इंडियाने भारतीय सणासुदीच्या हंगामासाठी आपल्या ऑपरेशन नेटवर्कवर 1,00,000 हून अधिक हंगामी नोकरीच्या संधी निर्माण केल्या आहेत. या संधींमध्ये संपूर्ण भारतातील मुंबई, दिल्ली, पुणे, बंगलोर, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि चेन्नई या शहरांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments