Type Here to Get Search Results !

पुण्यातीलससून हॉस्पिटल मध्ये रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी...

ससून हॉस्पिटल मध्ये रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी...

पुणे :- धुळे येथील हे एक रुग्ण गेले दोन ते तीन वर्षे दोन्ही गुडघ्यांच्या गुडघेदुखीने प्रचंड त्रस्त होता. सोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजारही होता. यासाठी त्यांच्यावर ससून जनरल हॉस्पिटल पुणे येथे दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया डॉक्टर प्रवीण देवकाते (रोबोटिक सांधे प्रत्यारोपण तज्ञ) यांनी डॉक्टर राहुल पुराणिक (रोबोटिक सांधे प्रत्यारोपण तज्ञ)  यांच्यासोबत "क्यूविस" रोबोट ने यशस्वीरित्या केली. डॉक्टर मनोज तोडकर, डॉक्टर प्रवीण लोंढे आणि डॉक्टर अंकित सोलंकी हे शस्त्रक्रिया नियोजन आणि पार पाडण्यासाठी च्या टीमचे सदस्य होते. डॉक्टर गिरीश बारटक्के (विभाग प्रमुख, ऑर्थोपेडिक विभाग) यांनी मार्गदर्शन केले.
ससून हॉस्पिटलमध्ये अश्या अनेक शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांना याचा मोठा फायदा जात असल्याचे दिसून येत आहेत.

रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाचे फायदे:
1. शस्त्रक्रिया करताना आवश्यक तेवढाच काप घेतल्याने जखम लवकर बरी होते, रक्तस्त्राव कमी होतो,वेदना कमी होतात परिणामी रुग्ण लवकर बरा होतो.
2. रोबोट शस्त्रक्रियेची अचूकता वाढवतो ज्यामुळे पायाचा बाक नीट होतो यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता जास्त होते .
3. मानवी त्रुटी होत नाहीत.


Post a Comment

0 Comments