Type Here to Get Search Results !

अबबबब....तब्बल 24 कोटी 90 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क एकाच नोंदणीत बुडावल्याचा ठपका ठेवत सह दुय्यम निबंधक भातंबरेकर यांचे निलंबन ; एकाच प्रकरणात एवढा मोठा घोळ तर, त्यांच्या बाकीच्या कार्यकाळात किती ; कोण कोण आहेत यामध्ये सामील ?


अबबबब....तब्बल 24 कोटी 90 लाख 
रुपयांचे मुद्रांक शुल्क एकाच नोंदणीत बुडावल्याचा ठपका ठेवत सह दुय्यम निबंधक भातंबरेकर यांचे निलंबन ; एकाच प्रकरणात एवढा मोठा घोळ तर, त्यांच्या बाकीच्या कार्यकाळात किती ; कोण कोण आहेत यामध्ये सामील ?

पुणे :
पुण्यातील आकुर्डी येथे असेलेले दुय्यम निबंधक कार्यालयाचे हवेली क्रमांक २४ सह दुय्यम निबंधक एस.पी. भातंबरेकर यांचे निलंबन करण्यात आले आहे. खरेदीखताच्या दस्तात तब्बल २४ कोटी ९० लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क कमी आकारल्याचा ठपका ठेवत भातंबरेकर यांचे निलंबन करण्यात आले आहे.

याबाबतचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव प्रितमकुमार जावळे यांनी काढले आहे. या कार्यालयाला गुरुवारी (१२ ऑक्टोबर) शहरचे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी अचानक भेट दिली. तसेच हिंगाणे यांच्या कार्यालयातील तपासणी पथकाकडून हवेली क्र. २४ या कार्यालयात चालू वर्षातील १ सप्टेंबर आणि ११ ऑक्टोबरपर्यंत नोंदविण्यात आलेल्या दस्तांची स्वैरपद्धतीने (रॅण्डम) तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीत भातंबरेकर यांनी ११ सप्टेंबर रोजी नोंदविलेल्या एका खरेदीखताच्या दस्तात २४ कोटी ९० लाख १५ हजार ८०० रुपयांच्या मुद्रांक शुल्काची कमी आकारणी केली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी ही बाब १७ ऑक्टोबरला राज्य शासनाला कळविली.

त्यानुसार भातंबरेकर यांनी खरेदीखताच्या दस्तात योग्य मुद्रांक शुल्क न आकारल्याने शासनाचा महसूल बुडाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भातंबरेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. १९ ऑक्टोबरपासून पुढील आदेश प्रसृत करेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश अंमलात असेपर्यंत भातंबरेकर यांचे मुख्यालय मुद्रांक जिल्हाधिकारी राहणार आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हे झाल्यानंतर आता हा विचार पडला आहे की त्यांच्या कार्यकाळात त्यांनी किती महसूल बुडवला असेल. आणि किती मलिदा त्यांना भेटला असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कोण कोण आहेत यामध्ये सामील ?
नोंदणी व मुद्रांक विभागात खरेदीखत करण्यासाठी दुय्यम निबंधकांनी व इतर अधिकाऱ्यांनी एजंट ठेवले असल्याचे पुणे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. हे एजंट अर्जंट नंबर मिळून देतो, तुमची दस्त नोंदणी शुल्क कमी करून देतो असे कारणे सांगून नागरिकांकडून अनेक रुपयांची लूट करत असल्याचे देखील सूत्रांकडून कळाले आहे. तसेच यांच्या समवेत यांना पाठीशी घालण्याकरिता वरिष्ठ अधिकारी देखील यांना सहकार्य करत असल्याचे माहिती मिळाली आहे. 
यावर सध्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, या अधिकाऱ्यांवरती तर कारवाईची सुरुवात झालीये म्हणा, परंतु अधिकाऱ्यांनी ठेवलेल्या एजंट वरती कारवाई कधी होणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. 

#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas

Post a Comment

0 Comments