Type Here to Get Search Results !

Pune Crime: भाचीचा वाढदिवस असल्याचे सांगून महिलेला बोलवुन बलात्कार केला.पुण्यातील घडलेली घटना...


पु
णे
: भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगून मित्राने २९ वर्षीय महिलेला कोंढव्यातील एका हॉटेलमध्ये बोलवले. तेथे पीडितेवर बलात्कार करून, तिचे फोटो मित्राला पाठवले. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी २९ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून कलीम सलीम शेख (वय ४५) आणि आश्रफ शेख (२५) या दोघांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय पीडितेला तिचा मित्राला याने फोन करत भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगितले. त्यानुसार पीडिता येवलेवाडी, कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये गेली. तेथे आरोपीने पीडितेवर अत्याचार केले. पीडितेला मारहाण करत तिच्या फोटोंचे स्क्रिनशॉट एका व्यक्तीला दाखवले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार २०१० ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

Post a Comment

0 Comments