बाळासाहेब आंबेडकर आष्टी डीवायएसपी कार्यलयात दाखल ; टाळे ठोकण्यास ; म्हणाले पोलिस...
बीड:- आदिवासी पिडितेला न्याय देऊन आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. याप्रकरणी कारवाईत दिरंगाई होत असल्याने आंबेडकर यांनी आज आष्टी येथील उपविभागीय पोलिस कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले याप्रसंगी ते बोलत होते.
आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणी आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही. यामुळे आष्टीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन आज दुपारी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग होत आहे. पीडितेने सांगितलेले आरोपी पोलिसांनी पहिल्यांदा पकडावे. मी पोलिसाच्या विरोधात नाही, फक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आहेत हे दाखवून देण्यासाठी आलो आहे. कोणत्याही महिलेला नग्न करण्याचा, व कोणाच्याही शेतातील उभे पिक नष्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही. घडलेली घटना लाजिरवाणी आहे. यामुळे या प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करून अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी पोलिसांनी तीन दिवसांत पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
Post a Comment
0 Comments