Type Here to Get Search Results !

मुंबई:-लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढल्यावर हाकल ; डोके फिरलेल्या माणसाने थेट महिला होमगार्ड सोबत केली मारहाण...

मुंबई:-लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढल्यावर हाकल ; डोके फिरलेल्या माणसाने थेट महिला होमगार्ड सोबत केली मारहाण...

काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर एका तरूणीने टीसीला मारहाण केली होती. तशीच एक दुसरी घटना मध्य रेल्वे मार्गावर घडल्याचे समोर आले आहे.

तेथे धावत्या लोकलमध्ये एका महिला होमगार्डला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. संतप्त माथेफिरून हे कृत्य केल्याचे समोर आले. याप्रकरणी कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत २४ तासांच्या आत त्या माथेफिरू आरोपीला बेड्या ठोकत अटक केली. मारुती अत्राम असे या आरोपीचे नाव असून या आरोपीने अश्याप्रकारे अजून गुन्हे केले आहे का याचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत.

का केली मारहाण ?

धावत्या रेल्वेमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता महिलांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या होमगार्डवरही हल्ला करण्यापर्यंत आरोपींची मजल गेली आहे. मध्य रेल्वेच्या कसारा लोकलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. महिला रेल्वे होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या नीरजा मुकादम यांच्यावर हल्ला करण्यात आला. कसारा लोकलमध्ये आरक्षित महिला जनरल डब्यात त्या पेट्रोलिंग करत असताना एक इसम अचानक महिलांच्या डब्यात चढला.

होमगार्ड नीरजा मुकादम यांनी त्याला हाकल आणि महिलांच्या डब्यातून खाली उतरण्यास सांगितलं. मात्र त्या इसमाला या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि संतापच्या भरात त्याने त्या डब्यातच होमगार्ड नीरजा यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याने त्यांना बेदम चोपलं, आणि वाशिंद रेल्वे स्टेशन येताच खाली उतरून थेट पळ काढला.

या हल्ल्यात होमगार्ड मुकादम जबर जखमी झाले आहेत . त्यांनी कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदवली असता अज्ञात आरोपीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गांभीर्याने घेत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने त्याचबरोबर एपीआय देशमुख ,पीएसआय जावळे ,पोलीस शिपाई शेवाळे ,खाडे, देसले, जाधव ,देवळे सह इतर कर्मचाऱ्यांनी कल्याण ते कसारा पर्यंत सर्व स्टेशनवर आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या घटनेनंतर अवघ्या २४ तासांच्या आत आरोपी मारुती अत्राम याला अटक करण्यात आली. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अजून अशाप्रकारचा काही गुन्हा केला आहे का, याचा तपास कल्याण जीआरपी पोलीस करत आहे.

टीसीला झाली होती मारहाण.

Post a Comment

0 Comments