Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

लागातार चार सामने हरल्यानंतरही पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर नाही ; जाणून घ्या उपांत्य फेरीचा संपूर्ण खेळ...

लागातार चार सामने हरल्यानंतरही पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर नाही ; जाणून घ्या उपांत्य फेरीचा संपूर्ण खेळ...

र्ल्ड कप २०२३ मध्ये आतापर्यंत २६ सामने पूर्ण झाले आहेत. मात्र सर्व संघ अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. पाकिस्तान संघासाठी ही स्पर्धा अजिबात चांगली राहिलेली नाही.

या विश्वचषकात पाकिस्तानने  ६ सामने खेळले असून त्यात फक्त २ जिंकले आहेत आणि ४ पराभव पत्करले आहेत. मात्र, ते अजुनही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर नाही. आता पाकिस्तानला आणखी ३ सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत बाबर सेना उपांत्य फेरीसाठी कशी पात्र ठरणार हा प्रश्न आहे.

पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग

आता उपांत्य फेरीत जाण्याची कोणतीही आशा बाळगण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. पाकिस्तानला हे तीन सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील जेणेकरून त्यांचा निव्वळ धावगती सुधारेल. याशिवाय ऑस्ट्रेलियाला पुढील ४ पैकी ३ सामने जिंकावे लागणार आहेत. त्यांना न्यूझीलंडचा पराभव करून उर्वरित सामने गमवावे लागले आहेत. न्यूझीलंडला त्यांचे उर्वरित सर्व सामने गमवावे लागतील तर श्रीलंका आणि अफगाणिस्तानला त्यांच्या ४ पैकी किमान २ सामने गमावावे लागतील. असे झाल्यास उपांत्य फेरीचे दरवाजे त्याच्यासाठी उघडू शकतात.


या संघांविरुद्ध हरले...

२०२३ च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा पराभव केला होता. यानंतर श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला. मात्र या दोन विजयानंतर पाकिस्तानला फक्त पराभवच मिळाला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. विश्वचषकात पाकिस्तानने सलग ४ सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Post a Comment

0 Comments