पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या ५ गुन्हेगारास पुण्यातुन केले हद्दपार...
पुणे :- पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ मधील पोलीस स्टेशनचे गुन्हे अभिलेखावर खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, दरोडयाची तयारी करणे, जबरी चोरी करणे, बलात्कार, विनयभंग, बाल लैगिंक अत्याचार करणे, पुरावा नष्ट करणे, गंभीर दुखापत करणे, दहशत माजवणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर घातक हत्यारे बाळगणे, शिवीगाळ, मारहाण अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधीत पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन खालील नमुद ०५ गुन्हेगारा विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ व ५६ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार आदेश केलेले आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपीमध्ये बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे (१) नटी उर्फ रोहन ऊर्फ ऋषिकेश मोहन निगडे, वय २८ वर्षे, धंदा काही नाही, रा. विश्वदीप तरुण मंडळाजवळ, १३ ताडीवाला रोड, पुणे (२) अजय काळुराम साळुंके उर्फ धार अज्या, वय २३ वर्षे, रा. लोकसेवा तरुण मंडळाजवळ, म्हशीचे गोठ्याजवळ १३ ताडीवाला रोड, पुणे (३) संतोष सिध्दार्थ चव्हाण, वय २७ वर्षे, रा. ४४८, रेल्वे कॉटर्स, नवरत्न तरुण मंडळाशेजारी, १३ ताडीवाला रोड, पुणे (४) अजय उर्फ सोन्या गिरीप्पा दोडमणी, वय २६ वर्षे, रा. लोकसेवा वसाहत, १३ ताडीवाला रोड, पुणे, तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे आशिष सुनिल मापारे वय २७ वर्षे, रा. आळंदी म्हातोबाची, आळंदी स्टेशन जवळ, ता. हवेली, जि. पुणे सध्या इनआम मस्जिद जवळ, बिल्डींग नं.५८३, रुम नं.०६, प्रायव्हेट रोड, पुणे यांचा समावेश आहे.
सदर कारवाई रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, प्रविण पाटील अपर पोलीस आयुक्त, प.प्रा.वि., पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यापुढील काळात देखील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ हद्दीतील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करुन गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे. असे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले आहे.
Post a Comment
0 Comments