ऑनलाइन आर्थिक फसवणूक झालेले अडीच लाख रुपये परत मिळून देण्यात शिवाजीनगर पोलीसांचे यश ; अर्जदाराने मानले पुणे पोलिसांचे आभार...
पुणे :- देशात सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आणि त्यामध्ये आर्थिक फसवणूक याला आळा घालणे कठीण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच आणखीन एक भर पडता शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील दाखल सायबर अर्ज क्रमांक 95/2023 मध्ये अर्जदार यांची युट्यूब वरील व्हिडीओ लाईक करून रक्कम मिळऊन देण्याच्या बहाण्याने ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाली होती.
अर्जदार यांच्या फसवणूक झालेल्या पैशाबाबत बँकेला प्रभाविपणे पत्रव्यवहार करून व तसेच पाठ पुरावा करून अर्जदार यांची 2,64,000/- रुपये संपूर्ण रक्कम रिफंड करून देण्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकास यश आलेले आहे.
सदरची कामगिरी वपोनि धन्यकुमार गोडसे आणि पो.नि.(गुन्हे) विक्रम गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पो ह. रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे, सायबर तपास पथक शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments