Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

कोंढवा पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल पत्रकारांच्या वतीने सन्मान...

कोंढवा पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल पत्रकारांच्या वतीने सन्मान...
पुणे :- पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन असतील, रूट मार्च असतील, रात्रीच्या वेळेस असलेली गर्दी यावर नियंत्रण ठेवणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थाच्या दृष्टीने कोंढवा हद्दीत झालेल्या धार्मिक तणावावर योग्यते नियंत्रण केले बाबत असे अनेक कार्य कोंढवा पोलिसांनी चांगल्या प्रकारे हाताळले आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आणखीन सुधारण्यासाठी याचा फायदा झाला आहे. त्यासाठी कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले, एलआयबी विभागाचे पोलीस हवालदार अमोल फडतरे आणि पोलीस अंमलदार शशांक खाडे यांना हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर सत्कारमूर्ती अधिकारी आणि कर्मचारी यांनी सन्मानित केल्यामुळे सर्वांनी आभार व्यक्त केला आहे.
या सन्मानामुळे सर्व कर्मचारी व अधिकारी आणखीन जोमाने काम करतील असे विश्वास त्या ठिकाणी असलेल्या पत्रकारांनी व्यक्त केले. आणि या सत्कारामुळे आमच्या 
सर्वांची जबाबदारी वाढली असल्याचे वपोनि सोनवणे यांनी सांगितले. 

यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर व जिल्हा समन्वयक मुज्जम्मील शेख यांनी सांगितले की, कोंढवा पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने कोंढव्यात काम करत आहे. चांगल्या कामाची प्रशंसा केलीच पाहिजे. आणि त्या कामाचा गौरव केलाच पाहिजे. यामुळे आज आम्ही हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्वांनी मिळून कोंढवा पोलिसांचा सन्मान घेतला आहे. 
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस क्राईम न्युजचे संपादक वाजीद खान, पत्रकार गणेश जाधव, सोहेल शेख, सतीश जाधव, फरहान शेख, अशपाक शेख, अलिम शेख, अझहर बैग, शाबाझ शेख, आयान सय्यद, दानिश शेख, आदी पत्रकार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचा सन्मान करताना.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले यांचा सन्मान करताना.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांचा सन्मान करताना.
पोलीस हवालदार (एलआयबी) अमोल फडतरे यांचा सन्मान.
पोलीस अंमलदार (एलआयबी) शशांक खाडे यांचा सन्मान.

Post a Comment

0 Comments