पुण्यातील कोरेगाव पार्क येथे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्याच्या नावाने चाललीये हॉटेल आणि रेस्टॉरंट अँड बार धारकांची लूट...
पुणे :- पुण्यातील पॉश एरिया म्हणून ओळखले जाणारे आणि युवकांना आणि युवतींना भोवळ घालणारे कोरेगाव पार्क येथील सुरू असलेले रेस्टॉरंट अँड बार व्यावसायिकांकडे राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या नावाखाली
अमोल आणि गणेश नामक असलेले इसम आर्थिक स्वरूपात वसुली करत असल्याची माहिती काही रेस्टॉरंट धारकांकडुन प्राप्त झाली आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क या विभागामध्ये माहिती घेतली असता अशी व्यक्ती त्यांच्याकडे कार्यरत नसल्याची माहिती अ विभाग राज्य उत्पादन शुल्क मधील उप निरीक्षक चोधरी यांनी दिली. यामध्ये आता प्रश्नचिन्ह हा निर्माण झाला आहे की नक्की
अमोल आणि गणेश आहेत तरी कोण ? आणि कोणाच्या नावाने करता येते वसुली कोण आहेत यांचे वाली असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
लवकरच करणार राज्य उत्पादन शुल्क विभागाचा स्कॅम उघड...
याही पलीकडे म्हणजे आम्हाला सूत्रांकडून देखील अशी माहिती मिळाली आहे की, पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क याच्या सर्व विभागाचे कार्यालय अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि इतर विभागाच्या कार्यालयात दोन दोन माणसे वसुलीसाठी नेमली आहेत. याबाबत लवकरच आम्ही या वसुली बहाद्दरांची नावे समोर आणणार आहेत.
Post a Comment
0 Comments