पुणे :- पुण्यातील महत्वाचे ठिकाण असलेले मालधक्का चौक येथे सुरू असलेले बांधकाम यांच्या कडून काम सुरू असताना महावितरण कंपनीचे वायर कट झाली होती. आणि लाईट नसल्यामुळे स्थानिकांना त्याचा 6 तास फटका बसला.
ही घटना 5 ऑगस्ट शनिवारी घडली होती. यामुळे नागरिकांचा तर नुकसान झालाच झाला परंतु महावितरण कंपनीचा देखील मोठा नुकसान झाला. याबाबत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिघे यांना संपर्क केला असता त्यांनी संबंधितांवरती तातडीने कारवाई करण्याचे आदेश मी खालील उपविभागास देतो असे सूचना दिले. परंतु कसबा पेठचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विष्णू माने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करण्यास टाळाटाळ केली. याचा अर्थ असाच का, की कदाचित बांधकाम व्यवसायिक यांच्याशी त्यांचे काहीतरी साठे लोटे आहेत असा का ?
यानंतर आमचे प्रतिनिधी 11 ऑगस्ट शुक्रवारी दुपारी दीड वाजता त्यांच्या कार्यालयात माने यांना भेटण्याकरिता गेलो असता ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. आणि त्यांना जाऊन अर्धा ते पाऊण तास पूर्ण झाला होता. तसेच त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात पंखे आणि लाईट सुरूच होती. त्यांना लाईट बिल ची काहीच चिंता नाही. तसेच महावितरण विभागात काम करत असलेले सर्वच अधिकारी असेच बेजबाबदार आहेत असे बऱ्याचदा निदर्शनास आले आहे. तर याचा अर्थ असाच होतो की महावितरणाला विद्युत (लाईट) याची काहीच परवा दिसत नाही राज्यात विद्युत वाचवण्याचा प्रकल्प देखील राबवला जातोय आणि महावितरण कडील अधिकाऱ्यांचा हा निष्काळजीपणा म्हणता येऊ शकतो.
ह्याचा व्हिडीओ देखील टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाथी लागला आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. या अधिकाऱ्यामुळे कंपनीचे नुकसान होत आहेतच त्यातल्या त्यात नागरिकांचे देखील हाल होण्याची वेळ निर्माण झाली आहे.
Post a Comment
0 Comments