Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने केली पथारी व्यावसायिकांना मारहाण ; कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता ; उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत गेली माहिती...

पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने केली पथारी व्यावसायिकांना मारहाण ; कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता ; उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत गेली माहिती...

पुणे :- शहरात खडकी पोलीस ठाण्याचं प्रकरण गरम असताना त्यात आता अजून एक भर पडली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणारे लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे यांनी कॅम्प भागात असलेले एमजी रोड वरील पथारी व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे.
                           👇 पहा व्हिडीओ👇
                           👆 पहा व्हिडीओ👆
हा प्रकार असा घडला की, पुणे कॅन्टोन्मेंट आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या वतीने गेल्या 10 ते 12 दिवसापासून कारवाई सुरू आहे. याच्या अनुषंगाने पोलीस आणि कॅन्टोन्मेंटच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते. ते करत असताना अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित होती. परंतु स्थानिक पथारी जो वैध आहे त्याला मारहाण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याठिकाणी माहिती घेतली असता पथारी व्यवसायिक त्यांना सहकार्य करून देखील मारहाण करण्यात आल्यामुळे स्थानिकांनी या गोष्टीचा तीव्रपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच खोटे गुन्हे दाखल करण्याबाबत एका पोलीस अधिकारी यांनी सांगितले होते.
गुन्हेगारी वाढण्याची तसेच कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता ? 
जर या पथारी व्यवसाय करणाऱ्यांना त्या ठिकाणी व्यवसायपासून दूर केले तर कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. गुन्हेगारी वाढू शकते. करण त्या ठिकाणी असलेले 1000 पेक्षाही जास्त कुटुंबांचा उदरनिर्वाह त्याठिकाणी होतोय. त्या कामगारांचा उदरनिर्वाह त्या व्यवसायातून होतोय. यांचे शिक्षण ही कमी असते. यांना काम धंदे मिळाले नाही तर हे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण मिळते. आणि ह्यातून गुन्हेगारी वाढण्याची तसेच कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत गेली माहिती ?
याबाबत त्याठिकाणी असलेल्या पैकी काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना कळविले असता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळविले असल्याचे सांगितले आहे. यावर आता प्रश्न निर्माण झाला आहे की सदर पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकटे यांच्या वर पोलीस आयुक्त आणि पोलीस सह आयुक्त काय कारवाई होईल ह्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Post a Comment

0 Comments