Type Here to Get Search Results !

बारामती, शिरूर लोकसभा आणि यात असलेले विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची कार्यकर्त्यांची भावना ; काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांची माहिती...

बारामती, शिरूर लोकसभा आणि यात असलेले विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची कार्यकर्त्यांची भावना ; काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांची माहिती...

पुणे :- देशात आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने बारामती लोकसभा व शिरूर लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने लोकसभा क्षेत्र निरिक्षक व समन्वयकांची नियुक्ती केली. त्यानूसार बारामती लोकसभा क्षेत्र निहाय कुणाल पाटील, निरिक्षक व रामहरी रूपनगर, समन्वयक व शिरूर लोकसभा मतदारसंघ क्षेत्र निहाय कुणाल पाटील, निरिक्षक व विशाल पाटील, समन्वयक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने पुण्यात आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेत निरीक्षक कुणाल पाटील यांनी सांगितले की, पुण्यासह बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच विधान सभा मतदार संघावर आम्ही आमचा उमेदवार देखील देणार आहोत. आम्हाला सर्व तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसने बारामती आणि शिरूर लोकसभा स्वबळावर लढवण्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असल्याची माहिती काँग्रेसचे बारामती-शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार कुणाल पाटील यांनी रविवारी दिली. पाटील यांनी काँग्रेस भवनात दोन्ही लोकसभा क्षेत्रांचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आमदार रामहरी रुपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आदी उपस्थित होते.
           👇👇👇 Advertisement👇👇👇
           👆👆👆 Advertisement 👆👆👆

मोदी सरकारकडून महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने देशात रोष वाढत आहे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे काँग्रेसकडून संघटनेचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद तुल्यबळ आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ स्वबळावर लढावेत, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र त्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील,' असे पाटील यांनी सांगितले.
           👇👇👇 Advertisement👇👇👇
           👆👆👆 Advertisement 👆👆👆
यावेळी आमदार संजय जगताप, माजी आमदार रामहरी रुपनवर, दादूशेठ खान सह प्रभारी, उपाध्यक्ष संग्राम मोहोळ खजिनदार महेशबापू ढमढेरे, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, सीमा सावंत महिला अध्यक्ष, किरण काळभोर युवक अध्यक्ष, तन्मय पवार पर्यावरण विभाग अध्यक्ष, महेश टापरे, आकाश मोरे व इतर  उपस्थित होते

Post a Comment

0 Comments