Type Here to Get Search Results !

पुण्यात 9 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन ; नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्याम चांडक यांचे आव्हान...

9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ; नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्याम चांडक यांचे आव्हान...

पुणे :- राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्याम सी. चांडक यांच्या मार्गदर्शनात ०९ सप्टेंबर २०२३ रोजी पुणे जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालया मध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.


या लोक अदालतीमध्ये धनादेश, बॅकचे कर्जवसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे आपआपसात तडजोड करण्याजोगे प्रकरणे व इतर फौजदारी प्रकरणे वैवाहिक आणि इतर वाद अशा दाखलपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे महसूल प्रकरणे इतर दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकूमाचे दावे, विशिष्ट पूर्व बंद कराराची पुर्तता विषयक वाद आदी प्रकरणे ठेवता येणार आहे. अशा प्रकारची प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता संबंधित न्यायलयातील तालुका विधि सेवा समिती अथवा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण या कार्यालयाशी संपर्क साधावा व लोक अदालमतीमध्ये सहभागी होवून आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत असे आव्हान जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्याम सी. चांडक व जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव सोनल एस. पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments