Type Here to Get Search Results !

कोंढाव्यात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने घडले मोठे अपघात ; आठ वाहनांना धडक : एका दुचाकी चालकाचे जागीच मृत्य...

कोंढाव्यात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने घडले मोठे अपघात ; आठ वाहनांना धडक...

पुणे :- कोंढवा येथील खडी मशीन चौकी समोर कात्रज कोंढवा बायपास येथे सिमेंटचे पाईप वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने त्याच्यापुढे जात असणाऱ्या एकूण ७ ते ८ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक धनकवडी येथील दुचाकी वर असलेला व्यक्ती मयत झाला आहे. यात सुदैवाने विद्यार्थी वाहतूक करणारी बस थोडक्यात बचावली आहे.
हा प्रकार कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील स्मशानभूमी समोर खडीमशीन पोलीस चौकी जवळ अपघाताचा प्रकार घडला आहे. सिमेंट पाईप वाहतूक करणारा ट्रक रजि नंबर MH 14 GD 6919 या वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने त्याची धडक इतर वाहनांना बसून अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदर अपघातात एकूण 8 वाहनांचे नुकसान झालेले आहे. अपघातात प्रशांत कृष्णा चोरे, वय 43 वर्षे, रा धनकवडी, पुणे यांचा मृत्यू झाला आहे. पाच ते सात इसम जखमी झाले आहेत. मयत इसमास ॲम्बुलन्सने ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. इतर जखमी इसमाना जवळील भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.


अपघात ग्रस्त वाहनांची माहिती पुढील प्रमाणे…

MH12 MK 9387 शाईन

MH12 TV 4208 टेम्पो

MH12 MV 6018 टेम्पो

MH12 NE 6501 महिंद्रा कार

MH12 UK 1449 रॉयल इंफिल्ड

MH 12 DC 3278 फॅशन

MH 12 ET 9752 कार

MH 12 JW 8064 फॅशन प्रो

अपघात ग्रस्त वाहनावरील चालकाचे नाव तेजस रामभाऊ काकडे, वय 22 वर्षे, रा मु पो साबळा तालुका केज जिल्हा बीड असे आहे.

कोंढवा पोलिसांनी घटनास्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments