Type Here to Get Search Results !

पुण्यातील समर्थ पोलीसांची उत्तम कामगिरी ; रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत...

पुण्यातील समर्थ पोलीसांची उत्तम कामगिरी ; रिक्षामध्ये विसरलेले अडीच किलो वजनाचे २ लाख किंमतीचे चांदीचे दागिने ज्येष्ठ नागरीकास केले परत...

पुणे :- दि. 25 जुलै रोजी रमेश रुपचंद जैन, वय ५७ वर्ष, व्यवसाय चांदीचे व्यापारी, रा. कुशल अपार्टमेंट, सोमवार पेठ. पुणे यांनी समर्थ पोलीस ठाणे, पुणे शहर येथे येवून माहिती दिली की, ते 25 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास शाहू उद्यान ते पुणे स्टेशन असा रिक्षाने प्रवास करीत असताना पुणे रेल्वे स्टेशन येथे रिक्षाचे भाडे देताना त्याच्याजवळ असलेली अडीच किलो वजनाची विविध प्रकारचे दागिन्याची बॅग किंमत २ लाख रु. ही रिक्षामध्ये विसरले. त्यानंतर चांदीच्या दागिन्याची बॅग रिक्षामध्ये विसरल्याचे त्याचे लक्षात आले असता ते पोलीस ठाणे येवून सदरबाबत माहिती दिली असता  रिक्षाचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस नाईक रहीम मुसा शेख यांनी समर्थ पोलीस ठाणे हद्दीतील शाहू उद्यान समोरील सी.सी.टि.व्ही कॅमेरे चेक करून कौशल्यपूर्वक रिक्षा क्र. एमएच १२ क्यू ई ६८७५ प्राप्त केला. सदर प्राप्त केलेले रिक्षा क्रमांकाची नाकाबंदी अॅपव्दारे त्याची माहिती प्राप्त करुन रिक्षाचा मालक नामे राहूल वाघमारे रा. कस्तूरबा गांधी, गणेशखिंड रोड, औंध येथे सपोफौज / दत्तात्रय मानसिंग भोसले व पोहवा प्रमोद बाळासाहेब जगताप यांनी सदर पत्त्यावर जावून समक्ष माहिती घेतली असता सदरची रिक्षा ही बजाज फायनान्स कंपनीने ताब्यात घेवुन नानापेठ, पुणे येथील इसमास विकली असल्याबाबत माहिती मिळाली. सदर रिक्षाचे वाहतूक विभागाकडून रिक्षावर असलेले चलनाची माहिती घेवुन त्यावरुन रिक्षा चालकाचा फोटो व त्याचे परमिटची माहिती घेवून रिक्षाचा शोध घेण्यात आला असता, रिक्षा ही हडपसर येथे भाडे घेवून गेली होती सदर रिक्षावरील चालक नाने दिगंबर सतिष जाधव वय 22 वर्ष रा. त्रिमृती चौक, कात्रज, पुणे यास फोन करून त्यास पोलीस ठाणे येथे बोलावुन घेवुन त्याचेकडे रिक्षामध्ये विसरलेले बॅगे बाबत चौकशी केली असता, सायंकाळी 5 वा. रात्रपाळीकरीता चालविण्याकरीता त्याचा नातेवाईक आर्यन माने यास दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर रिक्षामध्ये विसरलेल्या चांदीच्या दागिन्याचे बॅग बाबत दिंगबर जाधव याने आर्यन माने याचेकडे फोनव्दारे चौकशी कली असता, आर्यन माने यास रिक्षामध्ये एक लाल रंगाची बॅग मिळाल्याचे सांगितले त्यास सदरची बॅग पोलीस ठाणे येथे जमा करण्यास सांगितली असता बॅग सह तो पोलीस ठाणे येथे 10 वाजता हजर झाला त्याने त्यास मिळालेली चांदीचे दागिन्याची बॅग पोलीस ठाणे येथे दिल्याने दागिन्याचे मालक रमेश जैन यांनी सदर दागिन्याची खात्री केली असता सर्व दागिने सुस्थितीत मिळून आले असुन ते त्याचे मुळमालक रमेश जैन यांना सुर्पत करण्यात आले आहे.
बॅग मिळाल्यानंतर जैन यांनी समर्थ पोलिसांचा आणि रिक्षा चालकाचा आभार व्यक्त केला.
सदरची कामगिरी ही प्रविण पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, अशोक धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे. प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे, सपोफौज दत्तात्रय मानसिंग भोसले व पोहवा  प्रमाद बाळासाहेब जगताप मोहवा रोहिदास जवाहर वाघेरे पोना रहीम मुसा शेख यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments