Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुण्यातील मार्केटयार्ड पोलिसांची उत्तम कामगिरी ; उस्मानाबाद जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपीला केले अटक...

पुण्यातील मार्केटयार्ड पोलिसांची उत्तम कामगिरी ; उस्मानाबाद जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपीला केले अटक...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), शिराढोन पोलीस स्टेशन, उस्मानाबाद गु.र.नं.91/2023 भादवी कलम 302, 364, 324, 323, 504,506,143,147,148,149 मधील पाहिजे आरोपी नामे अशोक उर्फ बप्पा उर्फ खाऱ्या रामराजे पवार वय 26 वर्ष, रा.गांधी नगर, ता कळंब जिल्हा उस्मानाबाद यास मार्केट यार्ड पोलिसांनी गस्ती दरम्यान संशयावरून ताब्यात घेतले असता. चौकशी केले नंतर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. यामुळे मार्केटयार्ड पोलिसांनी उत्तम कामगिरी केली असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे.
यानंतर मार्केटयार्ड पोलिसांनी त्यास पुढील कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद यांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्निक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग शाहुराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलीस निरीक्षक गुन्हे स्वप्नाली शिंदे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस नाईक किरण जाधव, दिपक मोधे, पो अं आशिष यादव, मोहन झायटे, पोलीस अंमलदार सीताराम गायकवाड, सुधीर खुटवड यांनी केलेली आहे. 

Post a Comment

0 Comments