Type Here to Get Search Results !

पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाईत केलेल्या हाथगाड्यांची करतायेत मधेच सोड ? हाथगाडी कारवाईत उचलून अर्धा किलोमीटर अंतरावर नेऊन सोडण्याचा प्रकार झाला उघड ; पहा व्हिडीओ...

पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाईत केलेल्या हाथगाड्यांची करतायेत मधेच सोड ? हाथगाडी कारवाईत उचलून अर्धा किलोमीटर अंतरावर नेऊन सोडण्याचा प्रकार झाला उघड ; पहा व्हिडीओ...

पुणे :- पुणे महानगरपालिके अंतर्गत येत असलेले ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय यामधील अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी पैसे घेऊन म्हणजेच भ्रष्टाचार करून हातगाड्या सोडण्याचा प्रकार सुरू असल्याचे खात्रीलायक बाब टाईम्स ऑफ महाराष्ट्र च्या हाती लागले आहे. राज्यात भ्रष्टाचार विरोधी संघटना व लाचलचपूत विभाग यावर कडक कारवाई करून देखील त्याची भीती पुणे मनपा पालिकेच्या अतिक्रमण विभागाला नसल्याची स्पष्ट चित्र दिसत आहे. 
           👇👇👇 Advertisement👇👇👇
           👆👆👆 Advertisement 👆👆👆
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेले सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक प्रशांत कोळेकर यांनी नवीन जिल्हा परिषद येथे अनाधिकृत अतिक्रमन केलेल्या एका कुल्फीच्या हाथगाडी वर कारवाई करून ती अतिक्रमण विभागाच्या वाहनात टाकले होती. त्यानंतर तेथून ते हाथगाडी घेऊन गेले आणि साधारणपणे अर्धा किलोमीटर लांब आयनॉक्स थेटरच्या समोर ती कुल्फीची हाथगाडी अतिक्रमण विभागाच्या वाहनातून सोडून देण्यात आली. 
यानंतर टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी अतिक्रमण विभागाच्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक प्रशांत कोळेकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी अगोदर त्यावर उडवा उडवीचे उत्तर दिले नंतर त्यांना आमच्या प्रतिनिधीने सांगितले आम्ही पत्रकार आहोत कृपया आम्हाला व्यवस्थित माहिती द्या. तर सांगितले की त्या कुल्फीचे हाथगाडीचे लायसन्स होते ते पाहून आम्ही गाडी सोडून दिले आहे. 

                     👆👆पहा व्हिडीओ👆👆
परंतु यामध्ये प्रश्न असा निर्माण झाला आहे की,
● त्यांच्याकडे लायसन्स होते तर त्यांची गाडी उचललीच का ?
● आणि जर त्यांच्याकडे लायसन्स होते तर त्यांची हाथगाडी अर्धा किलोमीटर लांब नेऊन का सोडली ?
● तसेच अतिक्रमण विभागाला कारवाई केलेल्या हातगाडीला मधेच सोडण्याचा अधिकार आहे का?
हा प्रश्न निर्माण झाला आहे. व याबाबत आमच्याकडे या गोष्टीचे व्हिडिओ प्राप्त झाले आहे.
तसेच आम्ही आमच्या काही त्यांच्याच कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून यामधील असलेले काही सूत्रांकडून माहिती घेतली असता त्या कुल्फीचे हाथ गाडीचे लायसन्स नसल्याचे आम्हाला आमच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यावर आता नागरिकांना आणि पत्रकारांना असा प्रश्न निर्माण झाला आहे की, अशा मुजोर कर्मचाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि उपायुक्त माधव जगताप काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments