विद्यार्थी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष शोहेब खान यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात मोफत पीयूसी वाटप शिबिराचे आयोजन...
पुणे :- पुण्यातील काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी हवेली तालुकाध्यक्ष शोहेब खान यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पियुसी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी ते वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अनेक उपक्रम आणि शिबीरे राबवत असतात. यावेळी देखील आणि त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी त्यांनी व त्यांच्या समता युवा मंचाच्या वतीने वाहनांचे पीयूसी तपासून देण्याचे शिबीर घेण्याचे ठरविले आहे. हा कार्यक्रम 31 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत शितल पेट्रोल पंपा समोर कोंढवा खुर्द पुणे या ठिकाणी राबविला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानबारे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन समता युवा मंचाचे सिकंदर सय्यद, साद खान ,मोसिन शेख, बसिद शेख, फैजान खान यांनी केले आहे.
व तसेच शोहेब खान यांनी पुण्यातील तमाम नागरिकांना या शिबिराचे लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.
Post a Comment
0 Comments