पुणे :- काही दिवसांपूर्वी पुण्यात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जम्बो कार्यकारणी जाहीर झाली. त्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळाली आहे व तळागाळात काम करणाऱ्यांना देखील त्यामध्ये संधी मिळाली आहे. त्यातच तळागाळात काम करणारे व सतत नागरिकांच्या प्रश्नासाठी झटणारे रुपेश संत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रूपेश संत हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना मानणाऱ्या वर्गाने आनंद व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम देखील पार पाडले आहे. रुपेश संत यांनी मागील काळात अनेक पदांवर काम केले आहे. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
पद मिळाल्यावर काय बोलले रुपेश संत ?
रुपेश संत म्हणाले की, "राजकारण कळत नव्हते तेव्हापासून राष्ट्रवादी काँगेस पक्षात एक सामान्य कार्यकर्ता ते पुणे शहर विद्यार्थी उपाध्यक्ष, पुणे शहर युवक उपाध्यक्ष अश्या वेगवेगळ्या जबाबदारी देऊन गेल्या काही वर्षांच्या केलेल्या प्रामाणिक कार्याची पोचपावती म्हणून माझी पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मार्गदर्शक, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या आशीर्वाद व विश्वासामुळे मला ही संधी मिळाली. पक्षाने मला दिलेली संधी सार्थ करून पदाला अनुस्वरून पक्ष वाढीसाठी कार्य करून दाखवण्याची जाणीव कायम माझ्या मनात राहील. शहर उपाध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, पुणे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर, महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे मन:पूर्वक आभार त्यांनी मानले आहे."
Post a Comment
0 Comments