Type Here to Get Search Results !

कोंढव्यातील स्पाईस फॅक्टरी रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जवरुन भांडण ; रेस्टॉरंट मधील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाला बेदम मारहाण...

कोंढव्यातील स्पाईस फॅक्टरी रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जवरुन भांडण ; रेस्टॉरंट मधील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाला बेदम मारहाण...

पुणे :- पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या नामांकित स्पाईस फॅक्टरी हॉटेलमध्ये ग्राहकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मॅनेजर आणि 4 वेटर्सनी मिळून एकाला सर्व्हिस टॅक्सवरुन वाद घालून मारहाण केली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली आहे. 
सध्या हॉटेल्समध्ये सर्व्हिस टॅक्स आणि चार्जच्या नावाखाली ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे नेहमीच ग्राहक आणि हॉटेल प्रशासनामध्ये वाद निर्माण होतात. या नेहमीच्या वादामुळे अनेक हॉटेल चालकांनी बाऊन्सर्स तैनात केलेले आहेत.

पुण्यातील कोंढवा भागामध्ये असेलल्या हॉटेल स्पाईस फॅक्टरीमध्ये ही घटना घडली आहे. हॉटेलच्या बिलामध्ये सेवाशुल्क अर्थात सर्व्हिस टॅक्स लावण्यात आलेला होता. त्या सर्व्हिस टॅक्स ला बिलातून काढण्यास ग्राहकाने सांगितले परंतु ते न करता ग्राहकाला अरे रावीची भाषा करण्यात आली. त्यानंतर ग्राहक आणि वेटरमध्ये सुरुवातीला भांडण झालं. त्यानंतर इतर कर्मचारी आणि मॅनेजर भांडणामध्ये पडले.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला मारहाण केली असून ग्राहकानेही बचावाचा मारहाण केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे या घटनेत दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे. यानुसार हॉटेल मधील 1 मॅनेजर आणि 4 कर्मचारी यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भादवी कलम 307, 141, 143, 144, 147, 352, 504 असे कलम लागू करण्यात आले आहेत.
यातील 2 आरोपी अटक झाले आहेत तर बाकीच्यांचा शोध सुरु आहे.

अश्या मुजोर हॉटेल चालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक झाले आहे. कारण जर आज यांना अशीच सूट मिळत राहिली तर यामुळे भविष्यात मोठा परिणाम होऊ शकतो. आणि एखाद्याला मारून टाकण्यास हॉटेल मॅनेजमेंट देखील कमी करणार नाही. 

मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील हॉटेल्समध्ये बिलावरुन भांडण होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल्समध्ये बाऊन्सर्स तैनात करण्यात येत आहेत. 

सर्व हॉटेल धारकांनी सर्विस टॅक्स बंद करणे आवश्यक असल्याचे चित्र पुण्यात निर्माण झाले आहे. 


Post a Comment

0 Comments