Type Here to Get Search Results !

सरदार वल्लभभाई पटेल छावणी स्पेशालिटी व क्रिटिकल केअर हॉस्पिटल पुणे येथे विविध सुविधांचे उद्घाटन...

सरदार वल्लभभाई पटेल छावणी स्पेशालिटी व क्रिटिकल केअर हॉस्पिटल पुणे येथे विविध सुविधांचे उद्घाटन...

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) :- पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल छावणी स्पेशलिटी आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडव्हान्स्ड कार्डियाक सेंटर, प्रधानमंत्री जन औषधी केंद्र, नवजात शिशु अतिदक्षता विभाग आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक या नव्या विकसित सुविधांचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जीओसी-इन-सी, दक्षिणी कमांड, पुणे आणि केजेएस चौहान, प्रधान निदेशक रक्षा संपदा (दक्षिण कमान) यांच्या हस्ते 21 ऑगस्ट (सोमवारी) करण्यात आले. मेजर जनरल राजेंद्र जोशी, व्हीएसएम - एमजी (ओएल), दक्षिणी कमांड, पुणे, सौरव रे, अमोल जगताप, प्रसाद चव्हाण, नवेंद्र नाथ - निदेशकगण, दक्षिण कमांड, पुणे, एस. प्रभाकरन, उप-निदेशक, दक्षिण कमांड, पुणे, ब्रिगेडियर संदीप वासुदेव, एसएम - अध्यक्ष कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, सुब्रत पाल, सीईओ, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, डॉ. नितीश गुप्ता, संयुक्‍त सीईओ, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि सचिन मथुरावाला, नामनिर्देशित सदस्य, डॉ अगरवाल, डॉ विनायक गवळी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे इतर अधिकारी यांच्या प्रतिष्ठित उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला. 
कॅथ लॅब आणि सहा बेडचे कार्डियाक केयर युनिटचा समावेश असलेले कार्डियाक केयर सार्वजनिक खाजगी भागीदारी मोडवर स्‍थापित केले आहे. ज्याचे व्‍यवस्‍थापन ह्रदयरोगतज्‍ज्ञ डॉ. सुनिल अग्रवाल, डॉ.विनायक गवळी आणि त्‍यांची टीम करतील. नव्‍याने विकसित करण्‍यात आलेल्‍या प्रक्रिया जसे की 2 डी इको, स्‍ट्रेस टेस्‍ट, अँजिओग्राफी सवलतीच्‍या दरात केली जाईल. या व्‍यतिरिक्‍त पात्र रुग्‍णांसाठी महात्‍मा ज्‍योतिबा फुले जन आरोग्‍य योजनेअंतर्गत अँजिओप्‍लास्‍टी, पेसमेकर इम्‍प्‍लांटेशन, इंट्रा कार्डियाक डिफिब्रिलेशन यासारख्‍या प्रगत ह्रदयाच्‍या प्रक्रिया मोफत केल्‍या जातील. ह्रदयविकाराच्‍या वाढत्‍या ओझ्याच्‍या युगात हे नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.

स्‍फेरूल फाउंडेशन, कोटक महिंद्रा बँक आणि सीपीआर ग्रुप यांच्‍या आर्थिक सहाय्याने नवजात शिशु अतिदक्षता विभागाची स्‍थापना केली आहे. नवजात शिशु आयसीयू कॅन्‍टोन्‍मेंट हॉस्पिटल आणि इतर जवळच्‍या हॉस्पिटलमध्‍ये जन्‍मलेल्‍या नवजात मुलांसाठी सवलतीच्‍या दरात अतिदक्षता सेवा प्रदान करेल. हे युनिट अशा नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल ज्‍यांना महागडी एनआयसीयू केअर परवडत नाही आणि एनआयसीयू बेडची सतत वाढणारी मागणी पूर्ण करण्‍याची दीर्घकाळची मागणीही पूर्ण करेल.

Post a Comment

0 Comments