Type Here to Get Search Results !

पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा नवीन अध्यक्ष ? पुण्यातील राष्ट्रवादीचे युवक अध्यक्षांच्या फ्लेक्स वर झळकले पक्षाचे फादर बॉडीच्या अध्यक्ष पदावर निवड झाल्याची शुभेच्छा...

पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा नवीन अध्यक्ष ? पुण्यातील राष्ट्रवादीचे युवक अध्यक्षांच्या फ्लेक्स वर झळकले पक्षाचे फादर बॉडीच्या अध्यक्ष पदावर निवड झाल्याच्या शुभेच्छा...

पुणे :- पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची काही दिवसांपूर्वीच जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली. पक्षाच्या अनेक पदांचे वाटप पुणे शहाराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष पदी समीर चांदेरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु पुढे शहरात त्यांच्याकडून झळकले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की, पुण्यात नक्की राष्ट्रवादीचे किती शहराध्यक्ष आहेत ? 
आणि त्यातल्या त्यात अजित पवार गटाचा शहराध्यक्ष कोण ? दीपक मानकर की समीर चांदेरे यामुळे पुण्यात नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. 

जर अध्यक्षांकडूनच होत असतील अशी चूक तर कार्यकर्त्यांच कसं? 
पक्षातील काही युवक कार्यकर्ते यांच्यामध्ये देखील या चर्चेला उधन आला आहे की जर आमचे अध्यक्षच अशा गंभीर चुका करत असतील तर कसं चालणार. तसेच पद मिळताच जर त्यांच्या कडून अशी चुका होत असतील तर भविष्यात कसे काम करतील अशे प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.  तर काही कार्यकर्ते म्हणतायेत की ही चुकून झालेले आहे.

काय लिहिले आहेत त्या फ्लेक्स वर ?
"समीर चांदेरे आपली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सार्थ निवड झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन"

तसेच आमदार चेतन तुपे नक्की कोणत्या गटात ?
तसेच या फ्लेक्स मध्ये आमदार चेतन तुपे यांचा देखील फोटो टाकण्यात आला आहे. चेतन तुपे हे पवार गटात असल्याचे सर्वत्र पाहिले जात आहे. त्यात हे नवीन ट्विस्ट लोकांना काही पचत नाहीये. याबाबत आमदार चेतन तुपे यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.


Post a Comment

0 Comments