Type Here to Get Search Results !

एसटी महामंडळाचे मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथील गर्भवती महिला कर्मचारी सोबत विनयभंग ; तक्रार देऊन एक महिन्या नंतर झाला गुन्हा दाखल ; महिला आयोग कामाचा टाळाटाळ आणि गुन्हेगारांची पाठराखण? महिला आयोगाला नवीन अध्यक्ष द्या ; विद्यमान अध्यक्षांना पक्षाच्या कामातून महिलांसाठी सवड नाही - आमदार विद्याताई चव्हाण...

एसटी महामंडळाचे मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथील गर्भवती महिला कर्मचारी सोबत विनयभंग;एक महिन्या नंतर झाला गुन्हा दाखल ; महिला आयोगाचा महिला तक्रार दाराच्या तक्रारीची टाळाटाळ आणि गुन्हेगारांची पाठराखण? महिला आयोगाला नवीन अध्यक्ष द्या; विद्यमान अध्यक्षांना पक्षाच्या कामातून महिलांसाठी सवड नाही - आमदार विद्या चव्हाण...

पुणे ;- राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर ही मागे नाही. त्यातच अजून एक भर पडत महिलावर अत्याचाराचा प्रकार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी (एस.टी) या ठिकाणी एका गर्भवती महिला कर्मचारी सोबत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्मचारी महिला लघवी करण्यास गेली असता तिचा पाठलाग करणे, पिडित महिला गर्भवती असून मध्यवर्ती कार्यशाळेत कामास आहे. तेथील मध्यवर्ती कार्यशाळा व्यवस्थापक आरोपी दत्तात्रय चिकुर्डे व उप - अधिक्षक शकील सय्यद हे दोघेही वरिष्ठ अधिकारी असून पीडित गर्भवती महिलेला जाणून बुजून त्रास देत होते. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे तिच्यावर वारंवार बाजूला जाऊन कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. असे दाखवून पिडित महिलेला अर्वाच्य शिवराळ भाषेत शिवीगाळी करणे, वासनांद नजरेने भावनेने बघणे, केबिन मध्ये बोलवुन अश्लील भाषेत बोलुन लगट करण्याचा प्रयन्त करणे, तसेच याआधी महिलेला क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अपुरे कपडे देऊन तिच्यावर कारवाई करणे टोमणे मारणे मानसिक त्रास देणे महिलेला पाहून अश्लिल हावभाव करणे असा गैर प्रकार घडत होता. त्यामुळे सदर पिडित महिला हि तणावात गेली असून पिडित महिलेने राज्य महिला आयोग, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच भोसरी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार अर्ज दिला होता. मात्र सदर पिडित महिलेची दखल तब्बल एक महिन्यानंतर घेतली व रुग्ण सेवकांच्या मदतीमुळे आरोपी चिकुर्डे व सय्यद यांच्या विरोधात भोसरी पोलीस स्टेशन या ठिकाणी भादवी कलम 354 ड आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती असता अजून देखील यामधील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. वरील आरोपी हे एका खात्यात अधिकारी म्हणून आहेत त्यामुळे आम्ही चौकशी करून त्यांना अटक करणार आहोत अशी माहिती दिली आहे.
           👇👇👇 Advertisement👇👇👇
           👆👆👆 Advertisement 👆👆👆
महिला आयोगाचा महिला तक्रार दाराची तक्रारीची टाळाटाळ आणि गुन्हेगारांची पाठराखण...
महिला लैंगिक अत्याचार दक्षता समिती मधील वरिष्ठ महिला पदाधिकारी कडे सदर पिडित महिलेने अर्ज दाखल केल्यानंतर गरोदर असल्याचे पत्र दिल्यानंतर समितीतील महिलेने सदर कागद कोणता दिला आहे. मला समजत महिलेने अशी वल्गना करत आरोपींना महिला आयोगाने पाठीशी घालून त्यांना सहकार्य केले. जर एक महिलाच दुसऱ्या महिलेची मजबुरी समजू शकत नसेल, तर अशा वेळेस महिला खूप तणावात जातात. सदर पिडित महिलेवर तिच्या घरची जबाबदारी असल्याकारणाने तक्रार करण्यास घाबरत होती. मात्र वासनांद लोकांचे गैरप्रकार थांबायचे नाव घेत नसल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित गर्भवती महिलेने तक्रार दिली, याआधीही कार्यशाळा प्रमुख कारागीर मोहिते यांच्यावरही अशी तक्रार केली होती, त्यामुळे मध्यवर्ती कार्यशाळेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत असून संपूर्ण शहरात व एसटी महामंडळ कर्मचारी या सर्वांमध्ये आरोपी चिकुर्डे आणि सय्यद हे चर्चेचा विषय होत आहे. अशा वासनांद लोकांवर कारवाई केली जावी अशी चर्चेला जोर धरत आहे. सदर पिडित महिलेला वारंवार कामावरुन काढुन टाकण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे वरीष्ठ पदाधिकारीच भ्रष्ट आणि वासनांद असल्याने मध्यवर्ती कार्यशाळेचे नाव खराब होत आहे. अशा अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे मात्र वरिष्ठ पदाधिकारी व पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शहरातील नागरिकांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रशासनाचे राज्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
महिला आयोगाला नवीन अध्यक्ष द्या ; विद्यमान अध्यक्षांना पक्षाच्या कामातून महिलांसाठी सवड नाही ; रुपाली चकाणकरांना दिला आमदार विद्या चव्हाण घरचा आहेर...
याबाबत आमदार विद्याताई चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या गोष्टीबाबत सर्व कल्पना दिली असता त्यांनी याचा निषेध व्यक्त केला आहे. जर महिलांनी तक्रार दिल्यावर एक एक महिना लागत असेल आणि तक्रार दारास टाळाटाळ करत असतील तर कसे चालणार. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर कामावर आक्षेप घेतला आहे. विद्याताई चव्हाण यांनी सांगितले की " विद्यमान अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना त्यांच्या पक्षाच्या कामातून सवड नाहीये, या पदावर एखाद्या नॉन पॉलिटिकल जानकार महिलेला या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर बसविले पाहिजे. ज्याने महिलांसाठी आजवर काम करत आहेत ज्यांचे शिक्षण विधी क्षेत्रातून झाले असेल अशा महिलांना या पदावर संधी दिली पाहिजे. तसेच रूपाली चाकणकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सेलच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या आहेत. त्यांना आज असं वाटतंय की मला अध्यक्षपद मिळाला पाहिजे मला विधानपरिषद आमदार झालं पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजेल मला सगळंच काही मिळालं पाहिजे. मला त्यांच्याबद्दल काहीच आकस नाहीये परंतु जे काही पद आपण मागतोय त्याची क्षमता सुद्धा असली पाहिजे कमीत कमी माणसांमध्ये तसेच त्या पदाला न्याय देखील मिळाला पाहिजे. पण दररोज त्यांचा झकपक पणा बघा एवढंच त्या करतात. एखाद्या लग्नाला किंवा पार्टीला चाललोय असं जर गेलात तर तुम्ही पीडित महिलांसाठी काय काम कराल. तुम्ही त्या पीडित महिलेला काय न्याय देतील. त्यामुळे चांगल काम करणाऱ्या महिलेला हे पद मिळाले पाहिजे. महिला आयोगातील महिलांना काही देणं घेणं नाहीये. आशाताई मिरगे आशाताई भिसे होत्या त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलंय. रुपाली चकाणकरांना याचं काय गांभीर्य नाहीये. त्यांच्या नावाने जे उदो उदो करतील त्यांना त्यांच्या पक्षात जागा देखील मिळाली आहे. 

Post a Comment

0 Comments