Type Here to Get Search Results !

पुण्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी ईद-ए-मिलादुन्नबीच्या (जुलुस) मिरवणूकीची तारीख ढकलली पुढे ; जाणून घ्या कोणत्या तारखेला होणार आहे मिरवणूक...

पुण्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी ईद-ए-मिलादुन्नबीच्या (जुलुस) मिरवणूकीची तारीख ढकलली पुढे ; जाणून घ्या कोणत्या तारखेला होणार आहे मिरवणूक...

पुणे :- येत्या २८ सप्टेंबर रोजी ईद-मिलादुन नबी (मिरवणूक) साजरी होणार आहे. आणि त्याच दिवशी 28 सप्टेंबर रोजी हिंदू समाजाचा गणेश विसर्जन मिरवणूक आहे. एकाच दिवशी 2 मिरवणुका आहेत. या अनुषंगाने पुणे शहरातील मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांच्या आणि सर्व मंडळांची रविवारी आझम कॅम्पसच्या सभागृहात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की, आपल्या देशबांधव हिंदू बांधवांचा गणेश उत्सव हा 10 दिवस चालणार आहे आणि 10 दिवस चालते. त्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक काढली जाते.
त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा गांभीर्य पाहता मुस्लिम समाजाने ईद-ए-मिलादुन्नबी याची मिरवणूक 28 सप्टेंबर ऐवजी  रविवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी काढणार असल्याचे असे जाहीर झाले आहे. संपूर्ण शहरातील सर्व तरुण व मुस्लिम संघटनांनी याला होकार देऊन या उपक्रमाचे स्वागत करून आपल्या देशातील विविधतेत एकतेचा संदेश दिला आहे. आता या दोन्ही मिरवणुका सोप्या पद्धतीने एकत्रितपणे साजरा करता येईल. अशी माहिती मिळाली आहे.


याबाबत हिंदू समाजातील वरिष्ठांचे या निर्णयाचा केले स्वागत...
हा निर्णय खूप योग्य आहे. दोन्ही कार्यक्रम आपल्याला महत्त्वाचे आहे. ह्या निर्णयाचा समस्त हिंदू समाजाकडून स्वागत आहे.  या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा पुण्यातील मुस्लिम समाजाने हिंदू मुस्लिम एकतेचा आणि एकोपेचा संदेश दिला आहे. 
बाळासाहेब मालुसरे - अध्यक्ष मंडई विद्यापीठ कट्टा पुणे.

अतिशय चांगला निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे एकोपेचा संदेश गेलाय. मुस्लिम समाजाचे आम्ही आभारी आहोत.
विजय राजपूत - मनसे जनाधिकार सेना पुणे शहराध्यक्ष

Post a Comment

0 Comments