Type Here to Get Search Results !

पुण्यातील जगप्रसिद्ध जादूगार ईश्वर यांचे चौदावे पुण्यस्मरणा निमित्त जनजागृती अभियानाचे आयोजन...

पुण्यातील जगप्रसिद्ध जादूगार ईश्वर यांचे चौदावे पुण्यस्मरणा निमित्त जनजागृती अभियानाचे आयोजन...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), 21 जुलै (शुक्रवारी), जगप्रसिद्ध जादूगार ईश्वर यांचे चौदावे पुण्यस्मरण निमित्ताने जादूगार ईश्वर यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध उपक्रमाच्या जनजागृतीसाठी तसेच शैक्षणिक व विविध संस्थांच्या मदती साठी सुमारे तीन हजार जादूचे कार्यक्रम सादर केले आहेत.
त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव नाझीम सय्यद (जादूगार ईश्वर) यांनी 14 वर्षात बालगंधर्व पुरस्कार, राष्ट्रीय जादू पुरस्कार, अनेक पुरस्कार प्राप्त करून महाराष्ट्र मधील सर्वात मोठा जादूचा कार्यक्रम सादर करत आहे. यंदा 2023 मध्ये गणेशोत्सव नवरात्र महोत्सव मध्ये मंडळ व संस्था यांच्या द्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांना सामाजिक संदेश आणि जनजागृती कार्यक्रमच्या माध्यमातून देणार आहे असे जादूगार ईश्वर यांचे चिरंजीव नाजीम सय्यद (जादूगार ईश्वर) यांनी सांगितले. 
सध्या जादूगार ईश्वर यांचे चिरंजीव नाजीम सय्यद हे राज्यात त्यांच्या वडिलांची जागा घेत जादूचे शो करत आहेत. त्यांनी अनेक नवीन जादूचे शो दाखवून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

Post a Comment

0 Comments