Type Here to Get Search Results !

पुण्यातील हडपसर येथे उसने घेतलेले पैश्यांच्या वसुलीसाठी महिलेचा बलात्कार ; पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर केले व्हायरल...

पुण्यातील हडपसर येथे उसने घेतलेले पैश्यांच्या वसुलीसाठी महिलेचा बलात्कार ; पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर केले व्हायरल...

पुणे :- पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यातील हद्दीमध्ये संताप जनक प्रकार घडला आहे. पतीने ४० हजार रुपये परतफेड न केल्याने महिलेला घरी बोलावून पती , मुलांना जीवे मारण्याची धमकी देत बलात्काराचा संतापजनक प्रकार हडपसर म्हाडा कॉलनी येथे घडला आहे. विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला यांचे पतीने आरोपीकडून 40,000/- रुपये हाथ उसने घेतले होते आणि ते परत केले नाही या रागातून यातील आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीस राहते घरी बोलवून घेतले. फिर्यादी यांच्या पतीस आणि मुलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून फिर्यादी सोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध केले तसेच सदर संबंधचे सीसीटीव्ही मध्ये चित्रण झाले असता ते मोबाईल फोन मध्ये जतन केले आणि फिर्यादी यांनी पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नमूद अश्लील व्हिडिओ आरोपीने सोशल मीडिया वर प्रसारित केले.

याबाबत आरोपी इम्तियाज हासिम शेख, वय 47 वर्षे, धंदा व्यवसाय, राहणार बिल्डिंग ए/20 तळमजला, फ्लॅट नंबर 3, सुरक्षा नगर, म्हाडा कॉलनी, हडपसर पुणे. विरुद्ध हडपसर पोलीस ठाणे येथे गुरनं. 1086/2023 भादवी कलम 376, 376(2)(n), 506(2) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (इ)67(अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा दाखल करण्यासाठी दलित पॅंथर ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष इलियास शेख आणि अजहर शेख यांच्या पुढाकाराने हा गुन्हा दाखल करण्याकरिता गुप्त पद्धतीने पोलिसांपर्यंत माहिती पोहोचून हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. शेख यांच्या मदतीमुळे पोलिसांना आरोपीस अटक करण्यासाठी मदत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच सहा.पोलीस आयुक्त अश्विनी राख हडपसर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर, सहा.पोलीस निरीक्षक सारिका जगताप, सहा.पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पो उ नि कविराज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

रात्री उशिरा स्थानिक पोलीस व गुन्हे शाखा युनिट-६ कडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेमुळे कदाचित हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांचा त्यांच्याकडील असलेल्या पोलीस ठाण्यात धाक कुठेतरी कमी पडत असल्याचे समजले जात आहे ?

Post a Comment

0 Comments