सर्वात मोठी बातमी ; शरद पवार यांना पुन्हा मोठा धक्का, आणखी सात आमदारांनी दिला अजित पवार यांना पाठिंबा...
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून भाजपसोबत तसेच शिंदे गटा बरोबर सत्तेत गेले आहेत. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीकडे मंत्रिमंडळातील जबाबदारी असलेले महत्त्वाची खाती आहेत. मात्र शरद पवार यांनी आपण पुरोगामी विचारांना पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या आणखी सात आमदारांना अजित पवारांनी फोडलं आहे.
कोणत्या आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा ?
नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाहीतर नागालँडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील अजित पवारांसोबत असल्याचं सांगितलं आहे. आमदारांसोबत पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अजित पवारांना पाठिंबा दिल्याने शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर धक्का असल्याचं बोललं जात आहे.
नागालँडची विधानसभा निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादीला सात जागांवर यश मिळालं होतं. नामरी नचांग, पिक्टो, एस. तोइहो येप्थो, वाय. म्होंबेमो हूमत्सो, वाय. मानखा ओकोन्याक, ए पोंगशी फोम आणि पी लॉन्गॉन या राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता.
Post a Comment
0 Comments