Type Here to Get Search Results !

मोहरम निमित्त कोंढवा पोलीस ठाण्याचे वतीने अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठकीचे आयोजन...

मोहरम निमित्त कोंढवा पोलीस ठाण्याचे वतीने अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठकीचे आयोजन...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत वानवडी विभागातील कोंढवा, मार्केटयार्ड, वानवडी, बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील आगामी सणानिमित्त मोहरम सण साजरा करणारे व वानवडी विभागातील शांतता कमिटी सदस्य यांची १८ जुलै (मंगळवारी) कोंढाव्यातील पारगेनगर येथे सायंकाळी ६ वाजता अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी केले होते. 
या बैठकीसाठी विक्रांत देशमुख पोलीस उपायुक्त परिमंडळ ५, शाहूराव साळवे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, संदीप भोसले पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलीस स्टेशन, सविता ढमढेरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोलीस स्टेशन, सुरेशसिंग गौड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केट यार्ड पोलीस स्टेशन, भाऊसाहेब पठारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन तसेच माजी नगरसेवक गफूर पठाण, माजी नगरसेविका हसीना इनामदार, समीर शेख अल्पसंख्यांक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, छबील पटेल , इसाक पानसरे व वानवडी विभागातील ३ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ व गोपनीय कर्मचारी असा दोनशे पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.


बैठकी मध्ये खालील प्रमाणे सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

1) ताबूत व पंजा मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संयमाने व सामंजस्याने वागावे.

2) मिरवणुकी दरम्यान वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी स्वयंसेवक नेमावे .

3 ) ज्या ठिकाणी पंजे / ताबूत यांची स्थापना करण्यात येते विशेषता सर्व पंजे हे सोने किंवा चांदीचे असतात यासाठी विशेष करून ज्या ठिकाणी पंजे बसवले जातात त्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावे.

4) ज्या ठिकाणी पंजे / ताबूत बसवले जातात त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत योग्य सूचना देण्यात आलेल्या आहेत.

5. ताबूत या ठिकाणी स्वतःचे स्वयंसेवक नेमण्यात यावेत. सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेणार नाही याची दक्षता घ्यावी.

Post a Comment

0 Comments