एकदा मुख्यमंत्री बनण्यासाठी राज ठाकरेंना संधी द्या - मनसे जनाधिकार सेना पुणे शहराध्यक्ष विजय रजपूत ; एक सही संतापाची अभियानास पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
पुणे :- (प्रतिनिधी मुज्जम्मील शेख), सध्या राज्यभरात राजकीय भूकंप घडत आहेत. राजकीय घडामोडींमुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनातील आक्रोश व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक सही संतापाची अभियान सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राजकारण बघता मतदान कुणाला केले आणि लोक प्रतिनिधी कुणासोबत गेले अशा या स्वार्थी राजकारणाला लोकं वैतागले आहेत. याचा निषेध म्हणून आज पुणे शहरात एक सही संतापाची मोहीम राबवून शहरात अभिनव आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण जनधिकार सेना शहराध्यक्ष विजय अण्णा रजपूत यांनी सांगितले की, सध्या राज्यभरात राजकीय पटलावर चिखल झाला आहे. विकासाऐवजी जनतेला राजकीय धक्केच अधिक बसत आहेत. या राजकीय घटना-घडामोडींनी राज्यभरातील जनता हैराण झाली आहे. त्यांचे मन मोकळे होण्यासाठी एक सही संतापाची अभियान राज्यभरात राबविले जात आहे. एकदा आमच्या राज साहेबांना ही संधी द्या नक्कीच आमचे राज साहेब ह्या संधीचे सोनं करतील. शहरातही अभियान राबविले जात आहे. पुणेकरांकडून अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
एकदा मतदान केलं की राजकारणी जनतेला गृहीत धरणार. या घटनेचा तुम्हाला राग येत नाही का? चीड येत नाही की, संताप येत नाही?
जर संताप येत असेल तर संताप व्यक्त करण्यासाठी ' एक सही संतापाची ' करण्याकरिता पुणे शहरातील खडकमाळ येथे सामान्य नागरीकांच्या संतापाच्या सहया घेण्यात आल्या.
आंदोलनाला नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण जनधिकार सेना शहराध्यक्ष विजय अण्णा रजपूत, महिलासेना शहराध्यक्ष सुशीला नेटके, संग्राम तळेकर, आशिष देवधर, वसंत खुटवड, रवी साने, अमित झुरंगे, माई तळेकर, देवीश्री तळेकर, अश्विनी रजपूत व आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments