Type Here to Get Search Results !

नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर पठाण, राष्ट्रवादीचे अजीम गुडाकुवाला आणि अन्वर खान यांनी केला भाजपमध्ये प्रवेश...

नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर पठाण, राष्ट्रवादीचे अजीम गुडाकुवाला आणि अन्वर खान यांनी केला भाजपमध्ये प्रवेश...

पुणे :- कोंढाव्यातील सामाजिक कार्यकर्ते समीर पठाण, राष्ट्रवादीचे अजीम गुडाकुवाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 12 जुलै रोजी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारुवाला यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला आहे. कोंढाव्यात पठाण यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कामासाठी पुढे असतात.
काय म्हणाले पठाण मागील 25 वर्षापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेला त्या ठिकाणी संधी दिली आहे. आम्हाला पण एकदा संधी द्यावी. तसेच कोंढाव्यामध्ये भाजप पक्षी वाढी साठी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले. 
पठाण यांच्या प्रवेशामुळे बाकीच्या नगरसेवकांना जड जाणार असल्याचे चित्र निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तसेच त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे माजी पुणे शहर अध्यक्ष अजीम गुडाकुवाला यांनी देखील प्रवेश केला आहे. अजीम गुडकुवाला हे मुस्लिम बॅंकेचे संचालक होते. तसेच ते मागील काळात पी ए इनामदार यांचे निकटवर्तीय समजले जायचे. पक्ष प्रवेशानंतर गुडाकूवाला यांनी सांगितले की, राष्ट्रवादीत काम करत असताना खूप त्रास सहन करावा लागत होता अल्पसंख्यांक समाजाला कुठे किंमत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजप पक्षाने आजपर्यंत जे सांगितले ते करून दाखविले असे त्यांनी सांगितले. तसेच अनवर खान सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील प्रवेश केला आहे.

काय म्हणाले अली दारुवाला ?
इतर पक्षांमध्ये काम करत असलेले अल्पसंख्याक कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याक सामाजिक कार्यकर्त्यांना भाजप पक्षात घेऊन त्यांना वेगवेगळी जबाबदारी पसंती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच ज्या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाला अडचणी निर्माण होतील त्या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजासाठी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच अलि दारूवाला हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments