Type Here to Get Search Results !

वस्तू व सेवा कर दिन पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा ; उत्कृष्ट अधिकाऱ्यांचे सन्मान...

वस्तू व सेवा कर दिन पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा ; उत्कृष्ट अधिकाऱ्यांचे सन्मान...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), १ जुलै रोजी वस्तू व सेवा कर दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने वस्तू व सेवा कर भवन, येरवडा, पुणे येथे ६ वा वस्तू व सेवा कर दिन धनंजय आखाडे अपर राज्यकर आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी दिलीप दिक्षित, निवृत्त अपर विक्रीकर आयुक्त उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कर अनुपालन करणाऱ्या करदात्यांना तसेच पुणे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
यामध्ये राज्यकर उपायुक्त प्रकाश सूर्यवंशी, दत्तात्रय कोरडे, अभिजीत धने, सहाय्यक राज्यकर आयुक्त चंद्रशेखर बोर्डे, डॉ प्रिया देहेडकर, आस्थापना अधिकारी भगवंत चेचे, राज्यकर अधिकारी संतोष लठ्ठे, गणेश घुले, प्रशांत फलक, राज्यकर निरीक्षक संगीता क्षीरसागर, विजय पवार, अमोल मिडशीकर, अभिजीत ढोणे, उत्तम यादव, रमजान महाबरी, विकास पोटरे, अनंत कोरेगावकर, रोहित काटवटे, प्राजक्ता राणी, अमीन शेख, बानेश राऊत, नागोराव जाधव, सुहास कळबांडे, अमोल सरडे, श्रेयस पाटील, प्राजक्ता चंगेडिया व आदी अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय कर, राज्य कर व आंतरराज्य कर या तीन करांऐवजी एकच कर असेल - दिलीप दीक्षित...
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिलीप दिक्षित यांनी मुंबई विक्रीकर कायदा ते वस्तू व सेवा कर कायद्यापर्यंतचा प्रवास अत्यंत ओघवत्या शैलीत उपस्थितांसमोर मांडला. तसेच भारताला केवळ एकाच कराची आवश्यकता असल्याचे नमूद केले. त्यासाठी भविष्यात केंद्रीय कर, राज्य कर व आंतरराज्य कर या तीन करांऐवजी एकच कर असेल असा आशावाद व्यक्त केला.

अध्यक्षीय समारोपात महाराष्ट्र राज्याच्या महसुलातील चांगल्या कामगिरीकडे अपर राज्यकर आयुक्त, धनंजय आखाडे यांनी लक्ष वेधले आणि पुणे क्षेत्राच्या राज्यकरातील वाढत्या महसुली जमेवर देखील भाष्य केले. करदाते आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमास पुणे क्षेत्राचे सर्व राज्यकर सहआयुक्त, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल समाने, सहायक राज्यकर आयुक्त व चंद्रशेखर बोर्डे, सहायक राज्यकर आयुक्त यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला वस्तू व सेवा कर भवन येथे अतिशय मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

येत्या ३ जुलै ला रक्तदान शिबीराचे आयोजन...
त्याचबरोबर येत्या ३ जुलै २०२३ रोजी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तू व सेवा कर भवन, येरवडा, पुणे येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments