पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), पुणे पोलीस आयुक्तालयातील जबाबदारीचे खाते असलेले गुन्हे शाखा दोन याला अतिशय उत्तम अश्या अधिकाऱ्याची निवड झाली आहे. कोणत्याही गुन्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने तपास करणारे तसेच अतिशय संयमी अधिकारी म्हणून नंदकुमार बिडवई यांची ओळख आहे.
रिजन पेक्षा रिझल्ट वर भर देणारे हे अधिकारी आहे.
बिडवई हे अगोदर विशेष शाखा येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. अश्या अनेक जबाबदारीच्या पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. बिडवई यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास परिपक्व पद्धतीने केला आहे. त्यांचा माहिती देणाऱ्यांचा जाळ खूप मोठ्ठा आहे.
सध्या पुण्यातील जबाबदारीचे गुन्हे शाखेत युनिट 2 हे आहे.
कारण यामध्ये सहकारनगर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशन, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, लष्कर पोलीस स्टेशन, बंडगार्डन पोलीस स्टेशन हे सहा पोलीस स्टेशन या गुन्हे शाखेत येतात.
बिडवई यांची या गुन्हे शाखेत नियुक्ती झाली आहे.
याचा अर्थ असा आहे की या सहा पोलीस स्टेशन मधील गुन्हेगारांना चपराक बसणार असून अशी परिस्थिती पाहायला मिळु शकते.
काय म्हणाले बिडवई ?
नियुक्ती झाल्यानंतर टाइम्स ऑफ महाराष्ट्रच्या संपादकांनी बिडवई यांच्याशी बातचीत केली असता, बिडवई यांनी सांगितले की, गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यात जास्त लक्ष देणार आहे. तसेच महिलांची सुरक्षा असेल, गुन्हे उघडकीस आणणे असेल अश्या अनेक गोष्टींवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Post a Comment
0 Comments