Type Here to Get Search Results !

सिंहगड वाहतूक पोलिसांकडून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली ; एका चौकात 6 वाहतूक पोलीस थांबत असल्याने नागरिक झालेत त्रस्त...

सिंहगड वाहतूक पोलिसांकडून वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली ; एका चौकात 6 वाहतूक पोलीस थांबत असल्याने नागरिक झालेत त्रस्त... पहा व्हिडिओ

पुणे :- मागील काही महिन्यांपूर्वी पोलिस आयुक्तांनी चौका चौकातून वाहतूक पोलिस काढून घेतल्याने पुणेकरांनी सुटकेचा श्वास घेतला होता. परंतू आता पुन्हा रस्त्यावर गराडा घालून साज शोधताना वाहतूक पोलिस दिसत आहेत, तर विषेश म्हणजे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशालाच पायदळी तुडवून केराची टोपली दाखवली जात आहे.

चौकात दोन अंमलदारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी थांबू नये असे कंट्रोल रूम मधून बीसीद्वारे (broadcasting) वरिष्ठांनी आदेश होते, दोन पेक्षा अधिक जर थांबल्यास त्यात कडक कारवाईचा देखील इशारा वरिष्ठांनी दिला होता. परंतु आदेश देऊनही सिंहगड वाहतूक पोलिसांनी त्या आदेशाची ऐशी की तैशी केली आहे.
सिंहगड ट्रॅफिक पोलीस शाखेच्या चौकात सहा पोलीस मिळून कारवाई करत असताना टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या निर्दशनास आले आहे. इतर ठिकाणी वाहतूक जाम होत असतानाही फक्त वाहतूक शाखेच्या चौकातच ६ पोलिस पावत्या फाडताना दिसून येत आहे. 

                              पहा व्हिडिओ

वसुली वाल्यांची मज्जाच मज्जा...
आजूबाजूच्या दुकानदारांकडून माहिती घेतली असता रोजच कारवाई करून नागरिकांना वेठीस धरून पैसे उकळले जातात, तसेच बस स्थानक जवळच रिक्षा चालक कसेही रिक्षा उभी करून अवैध प्रवासी वाहतूक करत असताना त्यांच्याकडुन महिना बांधून वसुली करून दुर्लक्ष करत असल्याची माहिती दिली आहे. 

याही पलीकडे काही भयंकर व्हिडीओ आमच्या हाताशी लागलेल्या आहेत तेही लवकरच आणणार जनतेच्या आणि पोलीस आयुक्तांच्या समोर...
लवकरच करणार मोठा स्कॅम उघड...


अश्या वाहतूक पोलिसांवर कारवाईची मागणी होत असून पोलिस आयुक्त याची दखल घेऊन वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसविणाऱ्यांवर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष टिकून राहाणार आहे.

Post a Comment

0 Comments