Type Here to Get Search Results !

पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ; सिनियारीटी प्रमाणे बदल्या होत नसल्याने काहींची चर्चा...

पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ; सिनियारीटी प्रमाणे बदल्या होत नसल्याने काहींची चर्चा...

पुणे :- गृह विभागाने सर्वसाधारण बदल्या जाहीर केल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी लष्कर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरिक्षक यांची काही दिवसापूर्वी नियुक्ती झाली असताना पून्हा नव्याने बदली देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर सिनियारीटी प्रमाणे बदल्या होत नसल्याने काही प्रमाणात चर्चा रंगवल्या जात आहेत. 
बरेच पोलीस निरीक्षक हे सिनियर दर्जाचे आहेत तरी सुद्धा त्यांना साईड ब्रांच व वाहतूक शाखेत ठेवल्याचे चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे.


दि. २० रोजी सोमवारी रात्री उशिरा पोलीस आयुक्त यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले आहे.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदली पुढील प्रमाणे :

1 - संगीता सुनिल जाधव (वरिष्ठ निरीक्षक, बिबवेवाडी ते गुन्हे शाखा (भरोसा सेल)


2 - अशोक धर्माजी इंदलकर (वरिष्ठ निरीक्षक, स्वारगेट ते वाहतूक शाखा)


3 - सुनिल काशिनाथ झावरे (आर्थिक गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक स्वारगेट)


4 - विष्णु नाथा ताम्हाणे (वरिष्ठ निरीक्षक, खडकी ते वरिष्ठ निरीक्षक मुंढवा)


5 - राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (वरिष्ठ निरीक्षक, अलंकार ते वरिष्ठ निरीक्षक खडकी)


6 - राजेश रामचंद्र तटकरे (वरिष्ठ निरीक्षक, लष्कर ते वरिष्ठ निरीक्षक अलंकार)


7 - सुनिल पांडुरंग जैतापुरकर (वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर ते वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी)


8 - किरण बाळासाहेब बालवडकर (वाहतूक शाखा ते वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर)


9 - दगडू सय्यप्पा हाके (वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी ते सायबर पोलिस स्टेशन)


10 - निलीमा नितीन पवार (वाहतूक शाखा ते कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन)


11 - दत्ताराम गोपीनाथ बागवे (पोलिस निरीक्षक (गुन्हे) वारजे ते विशेष शाखा)


12 - अजय सुधीर कुलकर्णी (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन)


13. सुनिल बाबुराव माने (वरिष्ठ निरीक्षक विश्रामबाग ते वरिष्ठ निरीक्षक खडक)


14. विनायक बाजीराव वेताळ (वरिष्ठ निरीक्षक कोरेगाव पार्क ते आर्थिक गुन्हे शाखा)

Post a Comment

0 Comments