Type Here to Get Search Results !

ॲड. कुणाल खोपडे यांची अजून एक उत्तम कामगिरी ; गंभीर गुन्ह्यामध्ये असलेल्या असोपीस ॲड. कुणाल खोपडे यांनी युक्तिवाद करून केली मुक्तता...

ॲड. कुणाल खोपडे यांची अजून एक उत्तम कामगिरी ; गंभीर गुन्ह्यामध्ये असलेल्या असोपीस ॲड. कुणाल खोपडे यांनी युक्तिवाद करून केली मुक्तता...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), मागील काही महिन्यांपूर्वी 18 मार्च 2023 रोजी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वी कलम 307 खून करण्याचा प्रयत्न करणे असा गुन्हा आरोपी संदीप विठ्ठल खोपडे यांच्या विरुद्ध दाखल झालेला होता. एकटा आरोपी असताना भा.द.वी. कलम 307 सारख्या गंभीर गुन्ह्या मधून ॲड. कुणाल बबन खोपडे यांनी युक्तिवाद करून आरोपीस दीड महिन्याच्या आत मध्ये जामिनावर बाहेर काढले आहे. सदर जामीन अर्ज हा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए. रामटेके यांच्या समोर चालविण्यात आला. ॲड. कुणाल बबन खोपडे यांनी गेल्या महिन्यांपूर्वीच एका आरोपीला जामिनावर मुक्तता करून दिली होती. ॲड. खोपडे हे फौजदारी गुन्ह्यात चांगली पकड निर्माण केला आहे. याबाबत त्यांना सर्व स्थरावरून अभिनंदन केले जात आहे. ॲड.खोपडे यांची कामगिरी पाहता येत्या काळात फौजदारी गुन्हे साठी विशेष वकील मध्ये त्यांची ओळख निर्माण होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments