Type Here to Get Search Results !

पुणेकरांनी अनुभवला बॉलिवूड स्टाईलचा भव्य दिव्य फॅशन शो ; ग्लॅम मॅजिक्स तर्फे रुह फाउंडेशनसाठी दीड लाखाचा निधी...

पुणेकरांनी अनुभवला बॉलिवूड स्टाईलचा भव्य दिव्य फॅशन शो ; ग्लॅम मॅजिक्स तर्फे रुह फाउंडेशन साठी दीड लाखाचा निधी...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), येरवडा येथील क्रिएटीव सिटी मॉलमध्ये शनिवारी समाजातील शोषित आणि पीडित लोकांना आधार देण्याचे काम करणाऱ्या रुह फाउंडेशन साठी निधी संकलन करण्याच्या हेतूने लोकप्रिय फॅशन उद्योजक आणि ग्लॅम मॅजिकचे संस्थापक झिवान हारून यांनी भव्य शोचे आयोजन केले होते. अभिनेता आदित मित्तल यांच्या सहयोगातुन हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

झिवान नेहमीच प्रतिभावंत कलाकारांना आपले कलागुण दाखवण्यासाठी संधी प्रदान करत असतात. ग्लॅम मॅजिक्स तर्फे आयोजित केलेल्या 'द शेडो हंटर्स' या भव्य दिव्य फॅशन शो मध्ये विकलांग, तृतीय पंथीय, महिला आणि पुरुष या सर्वांना एकाच रॅम्प वर दाखवून सामाजिक भेदभाव नष्ट करण्याचा संदेश त्यांच्या वतीने देण्यात आला होता.
या शो मध्ये विविध राज्यातून 150 मॉडेल्स सहभागी झाले होते, शोचे कोरिओग्राफी : धीरज बनकर, रवी चव्हाण, गौरव जाजू ,गौरी कदम भांडगे यांनी केले. 

या कार्यक्रमातील काही ठळक मुद्दे :
साईबा अन्सारी, विनायक संध्या आणि एसआर डान्स स्टुडिओ यांचे मनमोहक नृत्य सादरीकरण केले.
● खडतर परिस्थितीवर मात करून समाजासाठी
आदर्श ठरलेल्या व्यक्तींना यावेळी "10 रुह इम्पॅक्ट अवॉर्ड " व  "9 ग्लॅम अचिव्हर्स अवॉर्ड" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
● 9 टॅलेंट, रिलायन्स ट्रेंड्स, ग्लॅम गिल्ट,अवंतिका युनिव्हर्सिटी एमआयटी (इंदौर), ओहाना, एआर, कुलीनन, सौम्या - फॅमिली ट्री फॅशन, लिबास-ए-सुल्तानिया आणि मॅड मोक यांच्या तर्फे ड्रेस डिझायनिंग करण्यात आले होते.
● ग्लॅम मॅजिक तर्फे या वेळी डिड लाख रुपयाचे डोनेशन रुह फाउंडेशन चे संस्थापक. मोहम्मद शोएब यांना चेकच्या स्वरूपात देण्यात आले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी यांनी घेतले परिश्रम...
शोबे, एनआरके ग्रुप, द जूनून, स्पाईस अप इव्हेंट्स, गाला, जया'ज ब्युटी, ISAS ब्युटी अकादमी, अक्षरम कलेक्शन, ग्लॅम मॅजिकस टीम, आदम सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अमित त्यागी, कार्यकारी संपादक इंडिया टुडे ग्रुप मोहित कपूर, बॉलिवूड फॅशन स्टायलिस्ट, डॉली गद्रे, कामरतज पठाण, नीता राजदान कौल, शुभम नांगरे, माही मनोचा, रोहित मनोचा, विशाल गोलप, टिंकेश कौशिक , केतकी जानी, अंजली गाडोया,शाहरोज शाह, ममता राजपूत, दिप्ती शाह, स्नेहा प्रल्हादका हे होते.

Post a Comment

0 Comments