Type Here to Get Search Results !

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासक गरड यांच्यासह 25 जणांविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; तक्रारदार सहा महिन्यांपासून बसले होते उपोषणाला ?

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासक गरड यांच्यासह 25 जणांविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; तक्रारदार सहा महिन्यांपासून बसले होते उपोषणाला?

पुणे :- पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी प्रशासकाविरुध्द महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. 

पुणे मार्केट यार्डमधील एका लिंबू विक्रेत्या महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९६/२३) दिली आहे. त्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीचा निलंबित प्रशासक मधुकांत गरड, दत्तात्रय कळमकर, संभाजी काजळे, अमोल घुले व इतर २० ते २५ जणांवर विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते २ फेब्रुवारी २०२३ दरम्यान माकेटयार्ड येथील भाजी मार्केटमध्ये घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भाजी मार्केट येथे लिंबु विक्रीचा व्यवसाय करत असत. मधुकांत गरड याने फिर्यादीस मारहाण करुन त्यांच्या लिंबुच्या मालाची चोरी करुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन येथे येऊन धंदा करुन काय मार्केट नासवत आहे काय असे म्हणाला. कृषि उत्पन्न बाजार समितीचे लोक तेथे येऊन फिर्यादी यांचे लिंबुच्या पाट्या व पिशव्या फेकून देऊन मार्केटमध्ये येऊन २० ते ३० लोकांना चिथावणी देऊन फिर्यादी यांच्या अंगाला हात लावून अश्लिल बोलला. एके दिवशी फिर्यादी या लिंबु विक्री करत असताना मधुकांत गरड याने त्यांच्याकडे पाहुन अश्लिल हावभाव त्यांच्या छातीच्या खाली हात लावून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तक्रारदार सहा महिन्यांपासून उपोषणाला बसले होते. त्यानंतर 12 एप्रिल 2023 रोजी त्यांना यश मिळाले आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments