Type Here to Get Search Results !

बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवा निमीत्त कोंढवा पोलिसांचे रुट मार्च...

बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवा निमीत्त कोंढवा पोलिसांचे रुट मार्च...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), जून महिन्या मध्ये बकरी ईद व आषाढी एकादशी धार्मीक सण उत्सव येवु घातले आहेत. सदर सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत निर्माण होवु नये म्हणुन पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजन शर्मा, यांचे आदेश व मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त शंभुराजे साळवे वानवडी विभाग यांचेसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व कोंढवा पोलीस ठाण्यातील 7 अधिकारी, 30 कर्मचारी, आर.सी.पी. 5. कोंढवा बीट मार्शल, सी. आर. मोबाईल, यांच्यासह कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत कोंढवा पोलीस ठाणे, आर्शिवाद चौक, सत्यानंद हॉस्पिटल, कोर्णाक पुरम सोसायटी, बादशाह नगर सोसायटी, भैरवनाथ मंदिर, भिमनगर वसाहत, नरविर तानाजी मालुसुरे चौक, (ज्योती हॉटेल चौक) या परिसरात रुट मार्च घेण्यात आला.
तसेच रूट मार्च दरम्यान नागरीकांना कोणत्याही अफवावर विश्वास ठेवु नये. अगामी सण मध्ये कुठलेही जातीय तेढ निर्माण होवु देवु नये तसेच पोलीस मदतीसाठी ११२ या नंबर कॉल करावा अशा सुचना देण्यात आल्या येणेप्रमाणे रुट मार्च राबविण्यात आला.

Post a Comment

0 Comments