Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणारे ट्राफिक डिव्हिजन मध्ये नेमकं चाललंय तरी काय ; टोविंग गाडीवरील प्रायव्हेट मुजोर कर्मचारी करतायेत नागरिकांकडे थेट पैशाची मागणी, पोलिसांनी पैसे स्वीकारण्यासाठी ठेवलाय माणूस, गाड्या टोविंग केल्यास नियमा पलीकडे हजारो रुपयांचा दंड, Google Pay गुगल पे च्या एक्सक्लूजीव स्क्रीन शॉट आमच्या हाथी ;एका चौकात 10 ते 12 पोलीस आणि ट्राफिक वॉर्डन, टोविंग गाडीवर कॅमेरे नाहीत, एका चौकातून दर दिवसाला 30 ते 40 हजार रुपयांची वसुली नागरीक झालेत त्रस्त...

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणारे ट्राफिक डिव्हिजन मध्ये नेमकं चाललंय तरी काय ; टोविंग गाडीवरील प्रायव्हेट मुजोर कर्मचारी करतायेत नागरिकांकडे थेट पैशाची मागणी, पोलिसांनी पैसे स्वीकारण्यासाठी ठेवलाय माणूस, गाड्या टोविंग केल्यास नियमा पलीकडे हजारो रुपयांचा दंड, Google Pay गुगल पे च्या एक्सक्लूजीव स्क्रीन शॉट आमच्या हाथी ;एका चौकात 10 ते 12 पोलीस आणि ट्राफिक वॉर्डन, टोविंग गाडीवर कॅमेरे नाहीत, एका चौकातून दर दिवसाला 30 ते 40 हजार रुपयांची वसुली नागरीक झालेत त्रस्त...

पिंपरी चिंचवड :- ट्राफिक पोलिसांना वाहतुक नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नियमन करण्यासाठी नेमलेले असताना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणारे हिंजवडी, वाकड, सांगवी, पिंपरी, चिंचवड, निगडी, तळवडे व इतर वाहतूक शाखेचा चाललाय वेगळाच कारभार. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वाहतूक शाखेत आमच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता, अतिशय गालबोट लागेल या स्वरूपाचे काम सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेला स्पष्ट सूचना केली आहे की, कुठलीही तक्रार येऊ देऊ नये. या स्वरूपाची सूचना दिली असताना देखील, ट्राफिक डिव्हिजन मध्ये टोविंगच्या नावाखाली थेट हजारो रुपयांची वसुली करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे तर काहीच नाही पैसे घेण्यासाठी थेट माणसे नेमली असल्याचे पाहायला मिळाले आहे. टोविंग गाड्यांवर काम करत असलेले प्रायव्हेट मुजोर कर्मचारी थेट नागरिकांना पैशाची मागणी करत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. याचा मुख्य कारण असा आहे की टोविंग गाडीवर कॅमेरे नसल्या मुळे अश्या गोष्टी घडत आहे.

एका डिव्हिजन मध्ये फक्त टोविंगची लाखोंची कमाई...
एका दिवसाला एका ट्राफिक डिव्हिजन मध्ये कमीत कमी 150 गाड्या टोविंग करून आणत असल्याचे समजले आहे. 
1 गाडी × 2000 रुपये × 150 गाड्या दिवस भरात = 300000 लाख रुपये एका डिव्हिजन मध्ये जमा होत आहे. ह्याचा हिशोब नक्की कोण पाहतंय. 
आमच्या जे दृश्य त्या ठिकाणी पाहिले असता डिव्हिजन मध्ये एक टोविंग वाला कर्मचारी व ट्राफिक वॉर्डन वही घेऊन बसत आहे. आणि तो सर्व हिशोब त्या ठिकाणी पाहत आहे.
आणि हे पैसे नक्की जाताहेत तरी कुठे याचा कडी मात्र हिशोब भेटत नसल्याचे दिसून आले आहे.

आबाबाब... गुगल पे वर घेतले जातायेत पैसे...
हे तर काहीच नाही नागरिकांकडून थेट गुगल पे फोन पे याच्यावर पैसे घेण्याचा प्रताप सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. याबाबत आम्हाला एक्सक्लूजीव स्क्रीन शॉट देखील आम्हाला प्राप्त झाले आहेत. 
ह्या पैसे स्वीकारणाऱ्या माणसांचे नाव 
जितेश लोनारे आणि 
भालचंद्र संदिपान कानडे असे आहे. हे स्क्रीन शॉट आम्हाला नागरिकांनकडून प्राप्त झाले आहे. 
याच्या पलीकडे देखील ट्राफिक डिव्हिजन जवळ असलेल्या दुकानदारांकडे देखील यांचे पैसे जमा होत असल्याचे देखील समजले आहे. 
दुकानदार देखील शंभर रुपयाला दहा रुपये आकारात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
तसेच टोविंगवर काम करत असलेले प्रायव्हेट कर्मचारी अतिशय गुंडगिरी करत असल्याचे देखील नागरिकांच्या तक्रारी असल्याचे दिसून आले आहे. टोविंग केल्यानंतर 236 आणि नो पार्किंगचे 500 रुपये असे एकूण 736 रुपये दंड असून याच्या व्यतिरिक्त टोविंग वरील प्रायव्हेट कर्मचारी आणि ट्राफिक वार्डन हे नागरिकांना लायसन्स आहे का ? आरसी कार्ड आहे का? गाडीचा इन्शुरन्स आहे का? मिरर आहे का? हेल्मेट आहे का? पिऊसी आहे का? अशा अनेक कागदपत्रांची मागणी थेट टोविंग करणारे मुजोर कर्मचारी नागरिकांकडे करत आहेत. हे ऐकल्यानंतर नागरिक त्यांना कागदपत्र देखील दाखवत आहेत परंतु त्यामधील एखादा कागदपत्र नसेल तर त्याचा लायसन्स नसेल तर दंड 5000 रु, इन्शुरन्स नसेल तर याचा दंड 2000 रु, मिरर नसेल तर 500 रु, पियुसी नसेल तर 500रु असे वेगवेगळे दंड त्यांना सांगून नागरिकांना भीती घालण्याचा काम सध्या त्या ठिकाणी सुरू आहे. हे सांगितल्यानंतर एक माणूस त्यांचा मध्यस्थी म्हणून पडतो आणि 2000 रुपयात सेटलमेंट करतो.

दुसऱ्या चौकातील दुकानदार देखील झाले त्रस्त ? 
काही दुकानदार यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी माहिती घेतली असल्यास त्या दुकानदारांनी सांगितले की आम्ही यांना कंटाळलोय हे रोज आमच्याकडे नागरिकांना पाठवून देत आहेत आणि आमच्याकडे पैसे जमा करून दर दिवसाला एका चौकातून साधारणपणे 30 ते 40 हजार रुपये घेऊन जात आहे. परंतु हे पैसे तळतळीचे असून आमच्याकडे जे नागरिक येत आहेत ते खूप तळतळ करून पैसे देत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. 

यांना नक्की पाठराखण करतोय तरी कोण ? 
असा सवाल नागरिकांना आणि आम्हाला उपस्थित झाला आहे. याबाबत आमचे संपादक यांनी पोलीस आयुक्त यांना भेट घेण्याकरिता गेले असता, पोलीस आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक यांनी आमच्या संपादकांना भेट घेऊ दिली नाही. याचा अर्थ असाच का? पोलीस आयुक्तालयातील देखील कर्मचारी यांना पाठराखण करून यामध्ये सामील तर नाहीत ना ? असा प्रश्न सध्या उद्भवला आहे.

काही डिव्हिजन मध्ये पोलीस कर्मचारी काढतायेत ड्युटीवर असताना झोपा?
काही डिव्हिजन मध्ये आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता त्या ठिकाणी अक्षरशः आपले कामकाज सोडून झोपा काढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हिंजवडी ट्राफिक डिव्हिजन मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा राजरोसपणा सुरू...
हिंजवडी या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सानप, बोराडे आणि इतर यांच्या समवेत त्या ठिकाणी असलेले 8 ते 10 ट्राफिक वॉर्डन एप्रिल महिन्यात मार्च एंड च्या नावाखाली हजार रुपयांची नोट करत असल्याचे नागरिकांचे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुबडे यांच्या निदर्शनास आणून द्यायला गेले असता, त्यांनी पत्रकारांशी अतिशय उगरीटपणाने बोलत असल्याचे पाहायला मिळाले. 

वाकड ट्राफिक डिव्हिजनचे पोलीस निरीक्षक पिंजन यांनी पत्रकारांनी हाक मारल्यानंतर न ऐकल्यासारखे करून घेतली पळवाट...
आमचे संपादकांनी वाकड ट्राफिक डिव्हिजनचे प्रमुख पोलीस निरीक्षक पिंजन यांना भेट घेण्याकरिता गेले असता त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांनी भेट न घालून देऊन नंतर पोलीस निरीक्षक पिंजण हे बाहेर आले असता, आमच्या संपादकांनी हाक मारली त्यावर त्यांनी न ऐकल्यासारखे करून सरळ गाडीत बसून निघून गेले असल्याचे पाहायला मिळाले. 

टोविंग केल्यानंतर काय असते नियम ?
नो पार्किंग मध्ये, फुटपाथवर पार्क केलेल्या वाहनांवर टोईंग व्हॅनद्ववारे कारवाई करण्यात येत असते. त्यांचा दंड हा शासन निर्णयानुसार नो पार्किंग व टोईंग चार्जेस असा मिळुन वसुल केला जातो.
परंतु टोविंग गाडीवर असलेले प्रायव्हेट कर्मचारी ते नागरिकांना कागदपत्रांची मागणी करत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. 

काही ट्राफिक डिव्हिजन मध्ये टोविंग गाडीत पोलीस शिपाई बसत असल्याचे आले निदर्शनास...
टोविंग गाडीवर गाड्या उचलण्यासाठी त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी असणे गरजेचे असते त्याच्यात त्या अधिकाऱ्याचे पद पोलीस नाईक वरील असणे गरजेचे आहे परंतु काही ट्राफिक डिव्हिजन मध्ये पोलीस शिपाई टोविंग गाड्यांवर बसत असल्याचे निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पार अ ऑगस्ट २०१६ नुसार मोटार वाहन अधिनियम १९८८ चे अधिकारांबाबत अधिसुचनेमध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे.  पुणे, पिंपरी चिंचवड व इतर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात पोलीस नाईक व त्यावरील दर्जाचे अधिका-यांना याबाबतीत अधिकार असल्याने टोईंग व्हॅन मध्ये त्या दर्जाचे अंमलदार / अधिकारी हजर राहुन कारवाई करु शकतात त्यांचेकडे कारवाई करीता ई चालान मशिन असणे आवश्यक असते.

या सर्व गंभीर स्वरूपाच्या प्रश्नांवर पोलीस आयुक्त काय कारवाई करतील याकडे सर्व आशावादी पीडित नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

Post a Comment

0 Comments