Type Here to Get Search Results !

हत्याराचा धाक दाखवुन कंपनी कामगारांना लुटणारी टोळी गजाआड, २३ मोबाईल, २ तोळे सोने, 9 मोटार सायकल व हत्यारासह ५,१७,३००/- लाखांचा मुद्देमाल पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला हस्तगत...

हत्याराचा धाक दाखवुन कंपनी कामगारांना लुटणारी टोळी गजाआड, २३ मोबाईल, २ तोळे सोने, 9 मोटार सायकल व हत्यारासह ५,१७,३००/- लाखांचा मुद्देमाल पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला हस्तगत...

पिंपरी चिंचवड :- एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाणेच्या हद्दीत वाढत्या जबरी चोरीच्या अनुशंगाने मा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सो यांनी गुन्हे शाखा युनिट 4 चे वपोनि ज्ञानेश्वर काटकर यांना ठोस कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरुन सदर गुन्हयाचा समांतर तपास करणेकामी पोउपनि इम्रान शेख, पो. अंगलदार फारुक गुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर असे पथक नेमुन सदर गुन्हयांची उकल करुन सदर वाढत्या जबरी चोरीला आळा घालण्याबाबत आदेश देण्यात आले.

पोउपनि शेख व पथक यांनी सदर जबरी चोरीच्या अनुशंगाने समांतर तपास करता पो.हवा. मुल्ला व मो. शि. भोईर यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काही इसम चोरीचे मोबाईल घेवुन सी.एन.जी. पंप पाठीमागे, जाधववाडी कडुन टेल्को कंपनीकडे जाणा-या शिव रोड जवळ, एम आय डी सी भोसरी, पुणे येथे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मोबाईल विकण्याचे प्रयत्न करीत आहे. वगैरे मजकुरचे मिळाले माहिती वरून सदर बातमीच्या अनुशंगाने इसम नामे १) सोमा दुर्गप्पा चौधरी, वय १९ वर्षे, रा. ७८६ / मुन्नाभाई चाळ, पवार पेट्रोलपंप जवळ, नेहरुनगर, पिंपरी, पुणे २) आदित्य सुरेश कोळी, वय १८ वर्षे, रा १७८६ / मुन्नाभाई चाल, पवार पेट्रोलपंप जवळ, नेहरुनगर, पिंपरी, पुणे ३) मुदस्सर अहमद सय्यद, वय-२१ वर्षे रा ४२०/४०१८, वल्लभनगर, बैडमिंटन हॉल जवळ, पिंपरी, पुणे यांच्याजवळ २३ मोबाईल, २ तोळे सोने, 19 मोटर सायकल व हत्यार असा एकुण ५.१५.३००/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. मिळुन आलेल्या मुद्देमालाबाबत चौकशी करता ते उडवा उडवीची व असमाधान कारक माहिती देत असल्याने त्यांना गुन्हे शाखा युनिट १ येथे आणुन अधिक तपास करता त्यांनी सांगीतले की, पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत एम. आय. डी. सी. भोसरी, सांगवी, वाकड व हिंजवडी भागात पहाटे कामावरुन येणा-या जाणा-या कामगारांना तसेच वाटसरूंना एकटे गाठुन हत्याराचा धाक दाखवुन त्यांच्याकडील मोबाईल व इतर मौल्यवान वस्तु जबरीने चोरी करीत असे. सदरबाबत अधिक तपास करुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले.

१. एम. आय. डी. सी. भोसरी पोलीस ठाणे गु. रजि. नं. ४६८ / २०२२ भादवी कलम ३८०, ३४

२. एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाणे गुरजि.नं. ५०/२०२३ भादवी कलम ३९४ ३४ सह आर्म अॅक्ट

कलम ४ (२५) ३. एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाणे गु. रजि.नं. ११८ / २०२३ भादवी कलम ३९२ ३४ सह आर्म अॅक्ट

कलम ४ (२५)

२४. एम. आय. डी. सी. भोसरी पोलीस ठाणे गु. रजि.नं. ११९ / २०२३ भादवी कलम ३९२ ३४ सह आर्म अॅक्ट

कलम ४ (२५)

५. एम. आय. डी. सी. भोसरी पोलीस ठाणे गु. रजि.नं. १२० / २०२३ भादवी कलम ३९२, ३४ ६. एम. आय. डी. सी. भोसरी पोलीस ठाणे गुरजि.नं. १२८ / २०२३ भादवी कलम ३९२ ३४ सह आर्म अॅक्ट

कलम ४(२५)

७. एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाणे गुरजि.नं. १३४ / २०२३ भादवी कलम ३९२, ३४ सह आर्म अॅक्ट

कलम ४ (२५) सह मपोका कलम ३७ (१) (३), १३५

८. सांगवी पोलीस ठाणे गु. रजि.नं. ९४ /२०२३ भादवी कलम ३९४, ३२३, ३४ सह मपोका कलम ३७(१) (३). १३५

९. सांगवी पोलीस ठाणे गु. रजि.नं. १५१ / २०२३ भादवी कलम ३९२, ५०६, ३४

नमुद आरोपींना पुढील कारवाई कामी एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपींकडून उर्वरीत मुद्देमालाबाबत अधिक तपास करुन आणखीन गुन्हे उघकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख पो. अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments